नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : जगातील सर्वात मोठे कोरोना लशीचे (corona vaccine) निर्माते पुणे बेस्ड सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Adar punawala) यांनी लोकांना इशारा दिला आहे. कोरोनातून (Coronavirus) बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होणार नाही, असा गैरसमज झाला आहे. त्यांनाही अधिक सावधान राहण्याची गरज आहे. कोरोनाच्या धोकादायक आफ्टरइफेक्ट्सबद्दल बोलताना त्यांनी अधिकाधिक काळजी घेण्याचं अपील केलं आहे.
पूनावाला यांनी ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट शेअर करीत ट्विट केलं आहे की, आता कोविड-19 च्या अधिक काळासाठी त्रास देण्याच्या प्रभावाबाबत आता स्पष्टपणे रिपोर्ट उपलब्ध आहेत. यासा
हे ही वाचा-हे सरपंच शंभर नंबरी सोनं आहे, 10 गावात सापडणार नाही!'गावकऱ्यांची दिवाळी गोड
तुम्ही कोरोनातून बरे झालात म्हणजे तुमच्यावरील धोका टळला असं समजू नका. तुम्ही काही महिन्यात पुन्हा संक्रमित होऊ शकता. यासाठी कृपया काळजी घ्या.
पूनावाला यांनी ब्लूमबर्गचा जो रिपोर्ट शेअर केला आहे, त्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना नंतर येणाऱ्या आरोग्याशी संबंधित त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. बरे झालेल्या अनेक रुग्णांना फुप्फुसं आणि ह्दयाचे आजार, लवकर दमायला होणं यांसारख्या अनेक स्वास्थाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच कारणाने सर्वच ठिकाणी पोस्ट-कोविड क्लिनिक्स सुरू झाले आहेत, जेथे पोस्ट-कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहे.
Now there are clear reports of the terrible long-term effects of COVID19, so don’t feel you can get it once and that will be the end of it. You can get reinfected in a few months, so please continue taking precautions. Read about the long term effects here https://t.co/PgwohNLmCM
सर्वात मोठा सण असणारी दिवाळी (Diwali) आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारपेठा ओसंडून वाहत आहे. महाराष्ट्र राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने या गर्दीने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. सोमवारी (9 नोव्हेंबर) राज्यात 3,277 रुग्णांची भर पडली त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा हा 17,23,135 एवढा झाला आहे. तर दिवसभरात 65 जणांचा मृत्यू झाला. राज्य सरकारचं कोविड पोर्टल हे काही तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या कळू शकली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.