Corona Vaccine मोठी बातमी : रशियाची Sputnik V लस ठरली 92% परिणामकारक

Corona Vaccine मोठी बातमी : रशियाची Sputnik V लस ठरली 92% परिणामकारक

रशियाचं स्पुतनिक V (Sputnik V) लस कोरोनापासून (Corona vaccine) बचावासाठी 92 टक्के परिणामकारक ठरल्याचं या देशाने सांगितलं आहे.

  • Share this:

मॉस्को, 11 नोव्हेंबर : रशियाचं स्पुतनिक V (Sputnik V) लस कोरोनापासून बचावासाठी 92 टक्के परिणामकारक ठरल्याचं या देशाने सांगितलं आहे. या लशीच्या चाचणीचे अंतरिम निकाल हाती आले असल्याचं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेनं सांगितलं आहे. याच संस्थेतर्फे कोरोना लशीचं जगभरात मार्केटिंग होत आहे.

रशियाने Sputnik V ची 16000 लोकांवर चाचणी केली. या लोकांना लशीचे दोन दोन डोस देण्यात आले होते.

या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला.

रशियाची पहिली लस Sputnik V एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती.

मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे.

"रशियन वृत्तसंस्था TASS  च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही.

रशियन वृत्तसंस्था TASS  च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही. "रशियन वृत्तसंस्था TASS  च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही.

"या लशीच्या क्लिनिकल ट्रायलया शेवटचा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यामुळे लशीच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.  भारतातही Sputinik V लशीच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने या लशीच्या चाचण्यांची परवानगी घेतली होती.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 11, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या