मुंबई, 28 डिसेंबर : कृष्णाच्या बासरीच्या सुरांच्या प्रेमात प्रत्येक जण पडायचा. त्यानं बासरी वाजवली की त्याचे सूर ऐकून फक्त गवळणीच नव्हे तर अगदी मुके जीवही (animal) धावून यायचे. विशेषत: गायींना (cow) कान्हाच्या बासरीचे सूर खूपच आवडायचे. त्याच्या बासरीचा आवाज कानात पडताच गायी कळपानं त्याच्याभोवती जमा व्हायच्या आणि कान्हाच्या बासरीचे सूर ऐकण्यात लीन व्हाययच्या. कृष्णाच्या या बासरीप्रमाणेच एका चिमुरडीच्या वाद्याच्या सुरांनीही गायींना आकर्षित केलं आहे. ज्याचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) झाला आहे.
ज्याप्रमाणे कृष्णा बासरी वाजवायचा त्याप्रमाणे या छोट्याशा मुलीनं Accordion वाजवलं. त्याचे सूर गायींच्या कानात घुमले आणि त्या धावत तिथं आल्या. ट्विटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता. ती मुलगी जसं हे वाद्य वाजवतं, तसं समोरून गायी धावत येतात. एक नाही, दोन नाही तर चक्क गायींचा कळपच तिच्यासमोर काही क्षणातच हजर होता. मुलीच्या वाद्याची ही जादूच म्हणावी लागेल.
खरंतर माणसांप्रमाणेच प्राण्यांना गाणी ऐकायला खूप आवडतात. संगीत त्यांना किती आवडतं याचा प्रत्यक्ष दर्शन वारंवार होतं.
ज्याप्रमाणे चिमुरडीनं वाजवलेल्या अकॉर्डिअनचा आवाज ऐकून गायी धावत आल्या, तसंच एका व्यक्तीनं Trumpet वाजवल्यानंतरही काही म्हशी धावत येतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. याशिवाय कित्येक व्यक्तींनी वेगवेगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना असेच वाद्याचे सूर ऐकून त्यांना आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
ऐकायला थोडं नवल वाटेल पण म्युझिक ऐकून गायी दूध देतात असा दावा भारतातील एका तरुण शेतकऱ्यानंही केला आहे.
मध्य प्रदेशातील कपूरिया गावात राहणारा आकाश चौरसिया. तो गायींचं दूध काढताना त्यांना म्युझिक (music) ऐकवतो. यामुळे गायी भरपूर दूध देतात असं तो सांगतो. त्यामुळे त्याचं उत्पन्नही वाढतं. आकाश आपल्या या अनोख्या पद्धतीसाठी इतका प्रसिद्ध झाला आहे की प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातील लोकही त्याच्याकडे येतात.