वॉशिंग्टन, 29 डिसेंबर : Teddy bear म्हणजे लहानपणांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाना आवडणारा. तो सोबत असला की अनेकांच्या चेहऱ्यावर हसू कायम राहतं. पण याच टेडी बिअरनं एका व्यक्तीच्या डोळ्यात मात्र पाणी आणलं. या व्यक्तीनं त्याला गिफ्ट मिळालेल्या टेडीच्या छातीला कान लावले आणि त्याला त्या टेडीतून जे काही ऐकू आलं त्यानंतर तो रडू लागला. टेडीतून येणारा हा आवाज म्हणजे त्याच्या मृत मुलाच्या हृदयाची धडधड होती.
अमेरिकेतील जॉन रेईड (Jhon Reid) यांनी गेल्या वर्षी आपल्या मुलाला कायमचं गमावलं. कार अपघातात त्यांच्या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जॉन यांना पार्सलमधून एक टेडी आला आणि या टेडीमध्ये त्यांना त्यांच्या मुलाची धडधड ऐकू आली. पण एका निर्जीव टेडीत हृदयाची धडधड हे कसं काय शक्य आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?
Last year, this man lost his 16-yr old son in a car wreck. He decided to donate his son’s organs, including his heart.
This month the heart recipient sent Dad a surprise gift - a teddy bear with a recording of his son's heartbeat.
@RexChapman यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जॉन यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये त्याचं हृदयही होतं. ज्या व्यक्तीला हे हृदय मिळालं होतं. तिनं जॉन यांना एक गिफ्ट पाठवलं. हे गिफ्ट म्हणजे हा टेडी बिअर.
व्हिडीओ पाहू शकतो की जॉन पार्सलमध्ये आलेला बॉक्स उघडतात. त्यामध्ये त्यांना एक चिठ्ठी मिळते. ती चिठ्ठी वाचताच त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर त्या बॉक्समधील टेडी काढून ते आपल्या कानाजवळ नेतात. टेडीच्या छातीला आपले कान लावतात आणि त्यांना त्यातून असा आवाज ऐकू आला जो ऐकताच ते रडू लागले.
टेडीच्या छातीतून त्यांना हृदयाची धडधड ऐकू येत होती. ही हृदयाची धडधड त्या टेडीची नव्हे तर त्यांच्या मृत मुलाची होती. ज्या व्यक्तीला जॉन यांच्या मुलाचं हृदय मिळालं होतं. त्या व्यक्तीनं हृदयाची धडधड या टेडी बिअरमध्ये रेकॉर्ड केली होती आणि जॉन यांना हा टेडी पाठवून दिला. जो ऐकताच जॉन इमोशनल झाले. त्यांना आपल्या मुलाची आठवण आली. किंबहुना टेडीच्या रूपात त्यांना आपला मुलगा परत मिळाला असं म्हणण्यासही हरकत नाही.