पाटणा, 01 मे : गेले काही दिवस संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडल्याच्या (Corona positive family) बातम्या येत आहेत. पण या कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह सर्व किंवा काही सदस्यांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं. या कुटुंबावर कोरोना भारी पडल्याचं चित्र होतं. पण आता अशा कुटुंबाची चर्चा आहे, ज्या कुटुंबावर कोरोना नाही तर कोरोनावर कुटुंब भारी पडलं आहे.
बिहारच्या (Bihar Coronavirus) अरवल जिल्ह्यात राहणारे व्यावसायिक मोहन कुमार यांचं कुटुंब. त्यांच्या कुटुंबात एकूण 11 सदस्य आहे (Bihar Corona positive family) . मुलांचं संगोपन चांगलं व्हावं यासाठी हे कुटुंब पाटणातील आशियाना नगरात एका भाड्याच्या घरात राहतं. कुटुंबातील एकेएक करत सर्वच्या सर्व 11 सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. संपूर्ण कुटुंबं कोरोनाच्या विळख्यात सापडलं. अडीच वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 65 वर्षांच्या आजीपर्यंत सर्व जण कोरोना पॉझिटिव्ह होते.
हे वाचा - कोरोनामुळं काय त्रास झाला? पाहा गर्भवती महिलेचा थक्क करणारा अनुभव
साहजिकच अशा परिस्थितीत कोणत्याही कुटुंबाची अवस्था व्हावी तशीच या कुटुंबाची झाली. कुटुंबाने कोरोनाचा धसका घेतला. एक भीती निर्माण झाली. या कुटुंबाचे प्रमुख मोहन कुमार आपल्या कुटुंबाला या संकटातून बाहेर कसं काढायची याचीच चिंता लागली. स्वतःसह कुटुंबातील सर्व कुटुंबाला कोरोना झाल्याने मानसिकरित्या ते खचलेच होते. पण कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबाला धीर देण्याची, त्यांची काळजी घेण्याची आणि त्यांना या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांचीच आहे, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते स्वतः आधी गंभीर झाले. स्वतःच्या मनातील भीती आणि चिंतेवर त्यांनी मात केली. स्वतःला सांभाळलं आणि हळूहळू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ते काळजी घेऊ लागले. आज त्यांचं संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यातून मुक्त झालं आहे. सर्वांची कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
हे वाचा - Positive News : हृदयात गंभीर बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बालकाने कोरोनाला हरवलं
हे शक्य झालं ते सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने. या दोन्ही गोष्टी आचरणात आणून या कुटुंबाने कोरोनाला आपल्यावर भारी पडू दिलं नाही.
मोहन कुमार यांनी सांगितलं, "7 दिवस त्यांना सकाळ-संध्याकाळ इंजेक्शन दिलं गेलं. आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता आम्ही सर्वजण काळजी घेत आहोत. संकट काळात घाबरण्याची नाही तर संयम राखण्याची गरज आहे. जेणेकरून कोरोना महासाथीला आरामात दूर करू शकतो"
देशात कोरोनाच्या वाढत्या आकड्यामुळे लोक घाबरले आहे. लोकांच्या मनात भीती, चिंता, नकारात्मक विचारांनी घर केलं आहे आणि यांनाच दूर सारत कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूलाही हरवणं अशक्य नाही, हेच या कुटुंबाने दाखवून दिलं आहे. फक्त देशातीलच नव्हे तर जगातील अशा कित्येक कोरोनाग्रस्त कुटुंबासाठी हे कुटुंब आदर्श आणि प्रेरणादायी ठरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.