मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनामुळं काय त्रास झाला? पाहा गर्भवती महिलेचा थक्क करणारा अनुभव

कोरोनामुळं काय त्रास झाला? पाहा गर्भवती महिलेचा थक्क करणारा अनुभव

‘अखेर ती काळरात्र संपली’; वाचा एका पत्रकाराच्या गर्भवती पत्नीला कोरोना झाल्यानंतर आलेला अनुभव

‘अखेर ती काळरात्र संपली’; वाचा एका पत्रकाराच्या गर्भवती पत्नीला कोरोना झाल्यानंतर आलेला अनुभव

‘अखेर ती काळरात्र संपली’; वाचा एका पत्रकाराच्या गर्भवती पत्नीला कोरोना झाल्यानंतर आलेला अनुभव

    मुंबई 1 मे: सध्या सपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनाने विळख्यात घेतलं आहे. यात गर्भवती महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अनेक गर्भवती महिलांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आपल्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीने कोरोनावर कशी मात केली, याचा अनुभव न्यूज18या न्यूज चॅनेलच्या पत्रकाराने सांगितला आहे.

    ते सांगतात,माझी पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती होती. तिला पाचवा महिना सुरू असताना एक दिवस अचानक तिला डोकेदुखी,अंगदुखी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. गर्भवती असताना अशी लक्षणं सामान्य असतात. म्हणून मी तिच्या डॉक्टरांनी दिलेल्या नेहमीच्या गोळ्या दिल्या. मात्र,दुसऱ्या दिवशी तिची तब्येत खूपच खालावली आणि तिला श्वास घेताना त्रास जाणवू लागला. 9 एप्रिलला तिला 100.3ते 100.4 डिग्री ताप होता. त्याच रात्री ती थंडीने कुडकुडत होती. कोलकात्यात उन्हाळा सुरू असूनही तिला मात्र, प्रचंड सर्दी आणि कफ झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला गोळ्या-औषधं दिली. मात्र,अचानक तिच्या शरीराचं तापमान झपाट्याने 93 डिग्रीपर्यंत कमी झालं (वैद्यकीय भाषेत याला आपण mild hypothermia म्हणतात) आणि ऑक्सिजनची पातळी देखील 88 पर्यंत खालावली.

    त्यानंतर मात्र, माझी भीतीने गाळण उडाली. शेवटी न राहवून मी रात्री 1 वाजता फॅमिली डॉक्टरांना फोन केला आणि माझ्या बायकोच्या स्थितीबद्दल सांगितलं. तीगर्भवती असल्याने तिला तात्काळ हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनीदिला. मी तिला घेऊन गेलो व त्याच दिवशी (10एप्रिल) सकाळी11वाजता तिचीआरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR) केली. तिचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह(Corona Positive Report)आला. त्यानंतर माझ्याअडचणींना सुरुवात झाली. तिच्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड शोधणं अतिशय गरजेचंहोतं. मी तिला मुकुंदापुऱ्यातील ईएम-बायपासवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखलकरण्याच्या प्रयत्नात होतो. कारण मला आमच्या डॉक्टरांनी ते हॉस्पिटल चांगलंअसल्याचं सांगितलं होतं.

    माझ्या पत्नीला जेव्हा समजलं की मी तिलाहॉस्पिटलमध्ये अ‌ॅडमिट करण्यासाठी प्रयत्न करतोय. ती प्रचंड घाबरली व रडारडसुरू केली. कारण,तिला भीती होती की एकदा जर ती हॉस्पिटलमध्ये गेली तर परतघरी येणारचं नाही. म्हणून डॉक्टरांच्याच सल्ल्यानं मी तिला घरीचविलगीकरणात ठेवलं. मी तिच्या शरीरातली ऑक्सिजन लेव्हल (Oxygen Level)तपासत राहिलो.फुफ्फुसातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी इन्हेलर आणि स्टेरॉईड्स देत राहिलो.हे सर्व सुरू करण्याअगोदर मी, 'द रबिंद्रनाथ टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्युटऑफ कार्डियाक सायन्सेस'शी संलग्न असलेल्या स्त्रीरोग तज्ञांचा आणितमिळनाडूतील मदुराईमध्ये डॉक्टर असलेल्या माझ्या काकांचा सल्ला घेतला.

    इन्हेलरकसं वापरायचं,याची माहितीमाझ्या फॅमिली डॉक्टरनं मला व्हिडिओ पाठवून दिली होती. तसंच तिची ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी तिला दिलेले एक्सरसाईज ती करतहोती. औषधं घेण्यापूर्वी तिने थोडं ब्रेड-बटर(Bread Butter)आणि डाळींबाचा रस घेतलाहोता. त्यानंतर तिला फळं आणि ज्युसशिवाय काहीच खावंस वाटत नव्हतं. यासोबतदुसऱ्या रुममध्ये आयसोलेट असलेल्या माझ्या मुलीचीही मला काळजी घ्यावी लागतहोती.

    या सर्वात सगळ्यात मोठं आव्हान होतं ते घर स्वच्छ करण्याचं.बायकोला कोरोना झाल्यानं मी काम करणाऱ्या बाईला सुट्टी दिली होती. त्यामुळेकपडे धुण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत सगळी कामं मलाच करावी लागणारहोती. घरात सगळे विलगीकरणात असल्यानं उदास वाटत होतं. मात्र,तरीही मी घरातील सर्व कामं आटोपली. या दरम्यान माझ्या आईने मला फोन करूनहिमतीनं काम करायला सांगितलं. मी खिचडी आणि ऑम्लेट बनवून मुलीला खाऊ घातलं आणिपत्नीच्या उठण्याची वाटत बघत बसलो होतो. अडीच वाजता ती उठली,मी तिलाओआरएस पावडर(ORS Powder)टाकलेलं पाणी दिलं. ऑक्सिजन पातळी तपासली. तिची ऑक्सिजन पातळी94वर पोहोचली होती. हे बघून मी सुटकेचा निश्वास सोडला.

    घरातील सगळी परिस्थिती बघून माझी मुलगी घाबरली होती. तिने मला विचारलं मम्मी कशी आहे?ती लवकर बरी होईल ना?मी तिला हो म्हटलं.

    ऑक्सिजनचा शोध -

    11एप्रिलच्या रात्री पुन्हा माझ्या पत्नीच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये चढउतारहोऊ लागला. माझ्या फॅमिली डॉक्टरनं पुन्हा तिला इन्हेलर आणि स्टेरॉइडदेण्याचा सल्ला दिला. तसेच इमरजन्सीसाठी ऑक्सिजन (Oxygen Cylinder)शोधून ठेवण्यास सांगितले.अगदी थोड्या वेळाच्या आनंदानंतर ऑक्सिजन शोधण्याचं सगळ्यात मोठं आव्हानमाझ्यासमोर होतं. मी थोडी चौकशी केल्यानंतर रेहमान नावाचा एक व्यक्तीऑक्सिजन सपोर्ट भाड्याने देत असल्याची माहिती मिळाली. याशिवाय मी आणखी एकाजणाला फोन केला. रेहमान12एप्रिलला सकाळी ऑक्सिजन सिलेंडर देऊ शकतो असंसांगितलं. मात्र,मला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती आणि मी श्यामलदालाफोन केला. त्यांनी सांगितलं की,तात्पुरत्या स्वरुपात ते ऑक्सिजन सिलेंडरदेऊ शकतात. मी त्यांना विनंती करून5कॅन घेण्यास सांगितले. त्यांनी त्यामेडीकलमधून रात्रीच्या साडेअकरा वाजता मला माझ्या घराजवळ ऑक्सिजन कॅन(Oxygen Can)आणूनदिले. मी12तारखेला माझ्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं. तसंचऑक्सिजनची सोय झाल्यानं मी निश्चिंत झालो आणि गोळ्या घेऊन झोपलो. मात्र,मलाएक अनामिक भिती वाटत होती. त्यामुळे मी तिच्या डॉक्टरांशी बोललो. त्यांनीमला निश्चिंत राहण्यास सांगितलं. त्यांच्या मेसेजमुळे मी जरा निवांत झालो.

    भयानक स्वप्न संपलं -

    मी12तारखेला सकाळी सहा वाजता उठून माझ्या पत्नीची ऑक्सिजन लेव्हल तपासली.ती97वर होती. मला खूप आनंद झाला. मी डॉक्टरांना तिची तब्येत सुधारतअसल्याची माहिती दिली. त्यांनी तिचे औषध सुरू ठेवण्यास सांगितलं. माझ्यापत्नीचा ताप कमी आणि खोकला कमी झाला होता. तिने भूक लागली असल्याचंसांगितलं. मात्र,तिची चव आणि वास घेण्याची क्षमता पूर्णपणे गेली होती.त्यानंतर पुन्हा डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांनी तिची ऑक्सिजन लेव्हल (Oxygen Level)तपासत राहण्यास सांगितलं. त्यादिवशी तिची ऑक्सिजन लेव्हल96ते98च्यादरम्यान झाली होती. डॉक्टरांनी तिला घरीच आयसोलेट करण्यास सांगितलं. एप्रिलमहिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा आमच्यासाठी भयानक स्वप्नाप्रमाणे होता.

    याकठीण प्रसंगानंतर मी माझ्या परिसरातील लोकांचा कोरोनाबाधितांना ऑक्सिजनमिळवून देण्यासाठी,उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणं,औषधं आणि जेवणपुरवण्यासाठी एक ग्रूप तयार केला. आमच्याकडे अॅम्बुलन्सची सोयदेखील आहे.सध्या मी एक सहा बेडचं कोविड सेंटर तयार करण्यासाठी काम करतोय. इथंटेलिमेडीसीन,डॉक्टर आणि नर्सेस ऑनलाइन उपलब्ध असतील. मी मेडिकल सपोर्टसाठीएका कंपनीशी बोलत आहे. अचानक अशा इमरजन्सी परिस्थितीत घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांचा सल्ला घ्या,असं या पत्रकाराने सांगितलं.

    First published:
    top videos

      Tags: Corona patient