जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Bhaubeej 2021 : उद्या भाऊबीज; जाणून घ्या भावाची ओवाळणी करण्यासाठीचा शुभ मुहूर्त

Bhaubeej 2021 : उद्या भाऊबीज; जाणून घ्या भावाची ओवाळणी करण्यासाठीचा शुभ मुहूर्त

Bhaubeej 2021 : उद्या भाऊबीज; जाणून घ्या भावाची ओवाळणी करण्यासाठीचा शुभ मुहूर्त

ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांनी सांगितले की, ‘6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज हा सण साजरा केला जाणार आहे. हा सण शुभ मुहूर्तावर साजरा करणे लाभदायक समजले जाते

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : भाऊबीज (Bhaubeej) हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा (Relationship) धागा दृढ करणारा दिवस. वसुबारसेपासून सुरू झालेल्या दीपोत्सवाची (Dipotsava) भाऊबीजेला सांगता होते. भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज उद्या, शनिवारी ( 6 नोव्हेंबर) साजरा होत आहे. या दिवशी भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त (Shubh Muhurat) हा तब्बल 2 तास 11 मिनिटे असणार आहे. आजतकने याबाबत वृत्त दिले आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेदेखील म्हणतात. या दिवशी बहीण भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यंदा हा सण 6 नोव्हेंबर 2021ला साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या स्नेहाचं प्रतीक असलेला हा सण उद्या, शनिवारी साजरा होत असून या दिवशी भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, ते जाणून घेऊयात. दिवाळीच्या दिवशी या जागांवरही दिवे लावायला विसरू नका; अनेक अडचणी होतील दूर ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांनी सांगितले की, ‘6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज हा सण साजरा केला जाणार आहे. हा सण शुभ मुहूर्तावर साजरा करणे लाभदायक समजले जाते. यादिवशी राहू काळात (Rahu kaal) भावाचे औक्षण करणे टाळावे. कार्तिक शुद्ध द्वितीया तिथी 5 नोव्हेंबर रोजी रात्री 11.14 वाजल्यापासून सुरू होईल, व 6 नोव्हेंबर रोजी रात्री 7.44 वाजता संपेल. या दिवशी भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1.10 ते 3.21 पर्यंत असेल. म्हणजेच औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त 2 तास 11 मिनिटे आहे.’ अशी आहे पूजेची परंपरा भाऊबीजेच्या दिवशी बहीण सकाळी आंघोळ करून कुलदैवत, भगवान विष्णू किंवा श्री गणेशाची पूजा करते. या दिवशी बहीण भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावते, व त्यावर पाच विड्याची पाने, सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवते. नंतर भावाच्या हातावर धांगा बांधून पाणी शिंपडत भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्राचा उच्चार करते. काही ठिकाणी, बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावत त्याला औक्षण करते, व नंतर त्याच्या मनगटावर धागा बांधते. मग ती तिच्या भावाला मिठाई भरवते. या दिवशी भाऊ जर त्याच्या बहिणीचे लग्न झाले असेल तर तिच्या घरी जाऊन जेवण करतात आणि त्यांना ओवाळणी म्हणून भेटवस्तूही देतात.भाऊबीजेला भावाचे औक्षण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ताटामध्ये कुंकू, फुले, अक्षता, सुपारी, विड्याची पाने, चांदीचे नाणे, नारळ, फुलांच्या माळा, मिठाई, धागा, केळी असावी. या सर्व गोष्टींशिवाय भाऊबीज हा सण अपूर्ण मानला जातो. दिवा लावताना, फटाके फोडताना हात भाजल्यावर लगेच घरच्या घरी करा हे सोपे उपाय दिवाळी सणाची सांगता 6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज या सणाने होणार आहे. भाऊबीज हा दिवाळीच्या धामधूमीमधील शेवटचा सण असतो. भाऊबीजेच्या या पवित्र पर्वाला भावाला औक्षण करण्यासाठी यंदा जवळपास सव्वा दोन तासांचा शुभ मुहूर्त असणार आहे. त्यामुळे तुम्हीही तयार व्हा आपल्या बहिणीकडून ओवाळून घ्यायला किंवा तुमच्या भाऊरायाला औक्षण करायला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात