नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घर उजळून टाकलं जातं. लोक घराच्या खोल्या, लॉबी, रेलिंग आणि गेटवर इलेक्ट्रिक स्कर्टिंग लावतात. एवढंच नाही तर, दुकान, कार्यालय, कारखाना अशा कामाच्या ठिकाणी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी रोषणाई केली जाते आणि तिची पूजा केली जाते. पण अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात. या काही ठिकाणी दिवाळीच्या रात्री दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, असं केल्यानं अनेक समस्यांपासून सुटका मिळते. चला तर मग, जाणून घेऊया, दिवाळीच्या रात्री कोणत्या ठिकाणी (Diwali Lighting 2021) दिवा लावावा. मंदिरात लोक घरातील पूजेच्या ठिकाणी अनेक दिवे लावतात. पण बाहेर मंदिरात दिवा ठेवायला विसरतात. मंदिरात दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळं दिवाळीच्या रात्री घराजवळील मंदिरात दिवा लावावा. असं केल्यानं आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. तुळशीजवळ दिवाळीच्या रात्री तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा. जरी तुमच्या घरात तुळशीचं रोप नसेल तरीही तुम्ही कोणत्याही रोपाजवळ दिवा लावू शकता. यामुळं घरात सौभाग्य येतं. पिंपळाखाली दिवाळीच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असं म्हटलं जातं की, असं केल्यानं यम आणि शनी दोष दूर होतात आणि धनाची प्राप्ती होते. दारात घराच्या दारावर दिवा लावणंदेखील खूप महत्त्वाचं आहे. यामुळं समस्या दूर होतात आणि समृद्धी येते. दिवाळीच्या रात्री मुख्य गेट/ प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावावेत. हे वाचा - Home Remedies For Burns : हात भाजल्यावर घरच्या घरी करा हे सोपे उपाय; त्रास कमी होईल अन् फोडही येणार नाहीत कचराकुंडी घरातील कचरा ज्या ठिकाणी जमा होतो, तो म्हणजे डस्टबिनजवळ. येथे दिवाळीच्या रात्री दिवा लावून पेटवावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते. हे वाचा - दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला; 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज बाथरूमजवळ दिवाळीच्या रात्री घरातील बाथरूमच्या कोपऱ्यात दिवा लावणं आवश्यक आहे. असं मानलं जातं की यामुळं राहू आणि चंद्राचे दोष दूर होतात आणि घरातील समस्या दूर होतात. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.