मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Home Remedies For Burns : हात भाजल्यावर घरच्या घरी करा हे सोपे उपाय; त्रास कमी होईल अन् फोडही येणार नाहीत

Home Remedies For Burns : हात भाजल्यावर घरच्या घरी करा हे सोपे उपाय; त्रास कमी होईल अन् फोडही येणार नाहीत

Home Remedies For Burns During Diwali: पाय किंवा शरीराचा इतर कोणता भाग भाजल्यास कोणी तो भाग पाण्यात धरतो तर, कोणी बर्फ चोळण्याचा सल्ला देतो. पण काही कारणानं आपल्याला भाजल्यास आधी काय करायचं याबाबत अनेकदा संभ्रम असतो.

Home Remedies For Burns During Diwali: पाय किंवा शरीराचा इतर कोणता भाग भाजल्यास कोणी तो भाग पाण्यात धरतो तर, कोणी बर्फ चोळण्याचा सल्ला देतो. पण काही कारणानं आपल्याला भाजल्यास आधी काय करायचं याबाबत अनेकदा संभ्रम असतो.

Home Remedies For Burns During Diwali: पाय किंवा शरीराचा इतर कोणता भाग भाजल्यास कोणी तो भाग पाण्यात धरतो तर, कोणी बर्फ चोळण्याचा सल्ला देतो. पण काही कारणानं आपल्याला भाजल्यास आधी काय करायचं याबाबत अनेकदा संभ्रम असतो.

नवी दिल्ली,04 नोव्हेंबर : स्वयंपाकघरात काम करताना काही वेळा निष्काळजीपणानं किंवा नकळतपणे अनेकांचे हात भाजल्याचा प्रकार घडला असेल. तसंच, दिवाळीत (Diwali) दिवे लावताना किंवा फटाके उडवताना अनेकजण योग्य काळजी घेत नाहीत आणि त्यांनाही भाजलं जाऊ (Home Remedies For Burns During Diwali) शकतं.

अशाच प्रकारे हात, पाय किंवा शरीराचा इतर कोणता भाग भाजल्यास कोणी तो भाग पाण्यात धरतो तर, कोणी बर्फ चोळण्याचा सल्ला देतो. पण काही कारणानं आपल्याला भाजल्यास आधी काय करायचं याबाबत अनेकदा संभ्रम असतो. काही वेळा केलेले उपाय हानिकारकही ठरतात. 4 नोव्हेंबरला दिवाळी आहे. अनेक ठिकाणी फटाक्यांना बंदी घालण्यात आली असली तरी, जे लोक यावेळी ग्रीन फटाके (Green crackers) वापरणार आहेत किंवा आपल्या घरी मेणबत्त्या किंवा दिवे लावणार आहेत, त्यांनी त्यांची प्रथमोपचार (First Aid) पेटी तयार ठेवल्यास ती खूप उपयुक्त ठरेल. भाजल्याच्या जखमेपासून लवकर आराम मिळवण्यासाठी तुम्ही घरी काय करू शकता (Home Remedies For Burns) ते आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

भाजल्यावर लगेच करा हे घरगुती उपाय

1. प्रथम वाहत्या पाण्यानं भाजलेला भाग धुवा

भाजल्यास, प्रथम वाहत्या पाण्यानं भाजलेला भाग धुवा किंवा थंड पाण्याच्या भांड्यात किमान 20 मिनिटं हात बुडवा आणि तो हलवत रहा. बर्फाचं पाणी किंवा बर्फ लावल्यानं त्वचेच्या ऊतींचं नुकसान होऊ शकते.

2. मध आणि खोबरेल तेल वापरा

भाजल्यानंतर लवकर आराम मिळवण्यासाठी ताबडतोब एका भांड्यात एक चमचा मध आणि एक चमचा खोबरेल तेल एकत्र करून भाजलेल्या जागेवर लगेच लावा. तुम्हाला जळजळ होण्यापासून आराम तर मिळेलच, शिवाय फोडही येणार नाहीत.

हे वाचा - फुगा फुगवता फुगवता फुटला अन् घशात अडकला, 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

3. तूप वापरा

हात भाजला असेल तर, तेथील त्वचेवर थंडीचाही परिणाम होतो. जर तुमच्याकडे पिंपळ आणि वटवृक्षाची मुळं असतील तर, तुम्ही हे सर्व एकत्र करून त्यापासून बाम बनवू शकता. असा बाम आधीच बनवून ठेवला तर घरात कोणाला काही भाजल्यास तो लगेच उपयोगात आणता येईल.

हे वाचा - Bigg Boss Marathi: कोण फेअर कोण अनफेअर मुद्द्यावरुन मीनल-विशालमध्ये पेटला वाद; बदलतील का मैत्रीची समीकरणं?

4. जात्यादि तेलाचा वापर

भाजलेल्या त्वचेचा दाह शांत करण्यासाठी जात्यादि तेलाचा वापर आयुर्वेदात अनेक वर्षांपासून होत आहे. हे वेदनांवर आरामदायी म्हणून काम करते.

5. कोरफडीचा (Aloevera) वापर करा

कोरफडीचा वापर करून आपण भाजलेल्या त्वचेला आराम मिळवून देऊ शकतो. याच्यानं त्वचा जलद बरी करते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips