नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : अनेक नात्यांपैकी भाऊ आणि बहिणीचं नातं हे सर्वात सुंदर नातं मानलं जातं. लहानपणापासून भाऊ-बहीण आपल्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये एकमेकांसोबत असतात. अगदी एकमेकांची लग्न झाल्यानंतर देखील भाऊ-बहीण कायम एकमेकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. भाऊ आणि बहीण (Brother and Sister) यांच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी जपणारा सण म्हणून भाऊबीज या सणाकडं पाहिलं जातं. भाऊबीजेच्या सणानं दिवाळसणाचा शेवट होतो. आज (6 नोव्हेंबर 2021) देशभर भाऊबीजेचा (Bhai Dooj 2021) सण साजरा केला जात आहे.
भाऊबिजेच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळते (औक्षण) आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. सहसा शुभ मुहूर्त पाहूनच ओवळणी केली जाते. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) बहिणींनी आपल्या भावाला ओवाळताना आणखी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भावाला ओवाळताना बहिणींनी काळे कपडे घालू नये आणि दिशांचीही (Directions) विशेष काळजी घ्यावी. आजतकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गोडाधोडानं करा दिवसाची सुरुवात! आहेत बरेच फायदे, जाणून घ्या
यावर्षी शनिवारी (6 नोव्हेंबर) भाऊबिजेचा सण आला आहे. शुक्रवारी, 5 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11 वाजू 14 मिनिटांनी द्वितीया सुरू झाली आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजून 44 मिनिटांपर्यंत द्वितीया सुरू राहील. द्वितीया तिथी जरी दिवसभर असली तरी औक्षण करण्यासाठी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपासून ते 3 वाजून 21 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल. म्हणजेच औक्षण करण्यासाठी केवळ 2 तास 11 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे.
भाऊबिजेला औक्षण करताना दिशांचं विशेष भान ठेवावं. भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेला आणि बहिणीचे तोंड ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावे. या दोन्ही दिशांकडे तोंड करून औक्षण करून घेणं शुभ मानलं जातं, अशी माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्रा यांनी दिली.
दिवाळीच्या दिवशी या जागांवरही दिवे लावायला विसरू नका; अनेक अडचणी होतील दूर
दिशा आणि मुहूर्ताला महत्त्व देण्याव्यतिरिक्त इतर काही गोष्टींचीदेखील बहिणींनी काळजी घेतली पाहिजे. भाऊबिजेच्या दिवशी भावाला ओवाळल्याशिवाय बहिणीनं काही खाऊ नये. राहु काळात औक्षण करणं कटाक्षानं टाळलं पाहिजे. या दिवशी भावा-बहिणीनं एकमेकांशी वाद घालू नये. भावानं दिलेल्या भेटवस्तूचा वाद न घालता मोठ्या मनानं स्विकार करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औक्षण करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नये.
वरील सर्व गोष्टींची काळजी घेऊन औक्षण केल्यास भाऊबिजेचा सण निर्विघ्न पार पडतो, असं ज्योतिषाचार्यांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali 2021, Diwali-celebrations