Home /News /lifestyle /

मेड इन इंडिया कोरोना लशीचे सकारात्मक परिणाम; COVAXIN ला आपात्कालीन मंजुरी मिळणार?

मेड इन इंडिया कोरोना लशीचे सकारात्मक परिणाम; COVAXIN ला आपात्कालीन मंजुरी मिळणार?

कोवॅक्सिनचा (COVAXIN) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा (clinical trial) अहवाल जारी केल्यानंतर या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर : मेड इन इंडिया कोरोना लस (CORONA VACCINE) कोवॅक्सिनचा (COVAXIN) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा (clinical trial) अहवाल जारी करण्यात आला. यामध्ये लस परिणाकारक आणि सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता या लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी (EUA) परवानगी मिळवण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी दुसऱ्यांदा अर्ज करण्यात आला आहे. कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला (EMERGENCY USE) मंजुरी मिळावी यासाठी भारत बायोटेकनं (BHART BIOTECH) केंद्र सरकारकडे पुन्हा अर्ज केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीनं जारी केला आहे. भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे. हे वाचा - COVAXIN किती कालावधीसाठी सुरक्षा देणार? स्वदेशी कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती ट्रायलमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिवाय ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात स्टोअर करता येऊ शकते, असं कंपनीनं पहिल्या टप्प्यातील चाचणीच्या अहवालात म्हटलं होतं. यामुळे सरकारसमोर लस साठवण्याचं आव्हान नसेल. यामुळे लशीकरण मोहिमेअंतर्गत ही लस देशभरात सहजरित्या उपलब्ध करता येऊ शकते. हे वाचा - COVID-19: मोठी बातमी! पुढील आठवड्यात सरकार 'या' लशीला मंजुरी देण्याची शक्यता याआधीदेखील भारत बायोटेकने लशीकरण सुरू करण्यासाठी तातडीने परवानगी देण्यासंदर्भात अर्ज केला आहे. गरजवंतांना तात्काळ लस देण्याची परवानगी मागणारा हा अर्ज भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे केला होता. पण सध्या तरी लशीला आपात्कालीन परवानगी देण्याबाबत विचार नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं, अशी माहिती सूत्रांनी याआधी दिली होती. पण आता कंपनीनं दोन चाचण्यांचे अहवाल दिल्यानंतर दुसऱ्यांदा अर्ज केल्यानंतर त्याला परवानगी मिळेल का याकडे लक्ष लागलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या