Home /News /lifestyle /

तुम्हालाही पोहे प्रचंड आवडतात? मग पोह्यांचे 'हे' पाच प्रकार ट्राय करून बघाच

तुम्हालाही पोहे प्रचंड आवडतात? मग पोह्यांचे 'हे' पाच प्रकार ट्राय करून बघाच

देशातील काही ठिकाणचे पोहे तिथली ओळख बनले आहेत. अशाच पोह्यांच्या (Poha Varieties) पाच पाककृती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या तुम्ही तुमच्या घरी सहजपणे बनवून त्यांचा आस्वाद घेऊ शकता.

    नवी दिल्ली, 11 एप्रिल :  आपण सर्वांनी न्याहारीमध्ये (Breakfast) पोहे खाल्ले असतील. पोहे जवळजवळ प्रत्येक घरात नाश्त्यासाठी कधी ना कधी केले जातात. देशभरात ही सर्वात सामान्य आणि चवदार असलेली नाश्त्याची पाककृती आहे. पोहे पचनास हलके असल्यानं ते दिवभरात कोणत्याही वेळी बनवता येतात. पोह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी कमी वेळात तयार केले जातात. देशातील काही ठिकाणचे पोहे तिथली ओळख बनले आहेत. अशाच पोह्यांच्या (Poha Varieties)  पाच पाककृती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या तुम्ही तुमच्या घरी सहजपणे बनवून त्यांचा आस्वाद घेऊ शकता. इंदोरी पोहे - मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आढळणारी ही पोहे रेसिपी शहराच्या नावानेच प्रसिद्ध झाली आहे. इंदोरी पोहे खाण्यासाठी लोक लांबून येतात. या पोह्यांमध्ये थोडासा गोडपणा असतो. कच्चा कांदा, मसाले, शेव आणि इतर साहित्यासह ते खाल्ले जातात. ही पाककृती बनवायला खूप सोपी आणि खायला खूप चवदार आहे. नागपूरचा तर्री पोहा – महाराष्ट्रातल्या नागपूरची ‘तर्री पोहा’ डिश प्रसिद्ध आहे. यामध्ये पोह्यांसोबत करीही (पातळ आमटी) दिली जाते. हे पोहे पौष्टिकही असतात. यामध्ये चिवडा, बारीक चिरलेला कांदा, जिरे, कढीपत्त्यासह इतर साहित्य वापरलं जातं. हे वाचा - या 5 कारणांमुळं अनेकांचे अकाली होतात केस पांढरे, ब्लॅक करण्यासाठी करा हे उपाय दही पोहे – दही-पोहा बिहार आणि झारखंडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ही अगदी सहज बनणारी रेसीपी आहे. ही फक्त पोहे चांगले धुवून त्यात दही आणि साखर घालून तयार केली जाते. खारा अवालाक्की - कर्नाटकात बनवलेली ही पोहे रेसिपी कर्बोदकं, जीवनसत्त्वं आणि प्रथिनांनी समृद्ध आहे. कांदा, आलं, मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ यासह इतर साहित्य हे पोहे तयार करण्यासाठी वापरलं जातं. हे नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह केले जातात. हे वाचा - फेस क्लीन अप आहे सगळ्या स्कीन प्रॉब्लेम्सचं मूळ; सुंदर, ग्लोईंग फेससाठी या टिप्स कांदा पोहे - कांदा पोहे रेसिपी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. या पोह्यांमध्ये कांद्याचं प्रमाण खूप जास्त असतं. पोहे बनवण्यासाठी कांदा तेलात भाजला जातो. पोहे तयार झाल्यावर वरूनही भरपूर कच्चा कांदा काही ठिकाणी टाकला जातो. हे शेव घालून हे पोहे खायला दिले जातात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Poha, Recipie

    पुढील बातम्या