नवी दिल्ली, 10 एप्रिल : वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. अलिकडे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत. केस पांढरे होण्याची समस्या तरुणांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही दिसू लागली आहे. मुलांचे केस पांढरे होणे ही चिंतेची बाब आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी काही रोखता येऊ शकतात. या समस्येवर मात कशी करता येईल हे जाणून (White Hair Problems) घेऊया. तरुण वयात केस पांढरे का होतात? झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, जेव्हा केसांचे पिग्मेंटेशन कमी होऊ लागतं, तेव्हा केसांचा काळा रंग पांढरा होऊ लागतो. लहान वयात किंवा मुलांमध्ये केस पांढरे होण्यामागे 5 कारणे असू शकतात, त्याविषयी जाणून घेऊया. 1. आनुवंशिकी प्रॉब्लेम लहान वयात केस पांढरे होण्याचे कारण आनुवंशिकता असू शकते. आनुवंशिकतेमुळे केस पांढरे होत असतील तर त्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. कारण, ही समस्या आपल्या जीन्सी संबंधित असते. तुमच्या आई-वडिलांना किंवा कुटुंबातील कोणाला ही समस्या लहानपणी झाली असेल तर तुम्हालाही लहान वयातच पांढरे केस दिसू शकतात. 2. तणाव आज-काल आयुष्यात प्रत्येकाला तणावाचा सामना करावा लागतो. हा ताण जास्त झाला की झोप न लागणे, चिंता, भूक न लागणे, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. एका संशोधनात असं दिसून आलं आहे की, तणावामुळे केसांच्या मुळांमध्ये असलेल्या स्टेम सेल्स कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. 3. ऑटोइम्यून डिजीज कमी वयात केस पांढरे होण्याचे कारण ऑटोइम्यून डिजीज देखील असू शकते. केस पांढरे होण्यास कारणीभूत असलेल्या ऑटोइम्यून रोगांची नावे एलोपेशिया किंवा विटिलिगो आहेत. या रोगांमध्ये, रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच पेशींचे नुकसान करू लागते आणि अकाली पांढरे केस येतात. हे वाचा - वजन कमी करण्यासाठी Black Coffee अशी ठरते फायदेशीर; साईड इफेक्टशिवाय weight loss 4. व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता कमी वयात केस पांढरे होण्याचे कारण व्हिटॅमिनची कमतरता देखील असू शकते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. हे जीवनसत्व आपल्याला ऊर्जा प्रदान करते, केसांची वाढ आणि केसांचा रंग नियंत्रित करते. 5. धूम्रपान बर्याच संशोधनांनी असे सुचवले आहे की, धूम्रपानामुळे तुमचे केस अकाली पांढरे होऊ शकतात. कारण, धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यातील रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळत नाही आणि ते पांढरे होऊ लागतात. हे वाचा - Healthy राहण्यासाठी नक्की खायला हवेत हे 5 Vegetarian Food; मिळतात अनेक फायदे पांढरे केस काळे कसे करावे? तुमचे केस लहान वयात पिकले असतील तर तुम्ही त्यावर लवकर उपाय करा. कारण, केस पांढरे होण्याची बहुतेक कारणे टाळता येण्यासारखी असतात. केस पांढरे होण्यामागील कारण जाणून घेतल्यास, डॉक्टर त्यावर उपचार करू शकतात, ज्यामुळे केसांचे रंगद्रव्य परत येईल आणि ते काळे होतील. शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असेल तर तुम्ही त्याचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. त्याचबरोबर केस पांढरे होऊ नयेत यासाठी धूम्रपान सोडणे आवश्यक आहे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.