जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Rice water : कोणत्या औषधापेक्षा कमी नाही भाताचं पाणी; 'या' समस्यांवर रामबाण उपाय

Rice water : कोणत्या औषधापेक्षा कमी नाही भाताचं पाणी; 'या' समस्यांवर रामबाण उपाय

Rice water : कोणत्या औषधापेक्षा कमी नाही भाताचं पाणी; 'या' समस्यांवर रामबाण उपाय

Rice water benefits : भात शिजल्यानंतर जास्तीचं पाणी फेकू नका, त्याचे बरेच फायदे आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 11 डिसेंबर : जेवणात भाताचे (Rice) महत्त्व अधिक आहे. तांदूळ शिजवून भात केला जातो. अनेकदा भात शिजल्यानंतर त्यातील पाणी (Rice Water) आपण फेकून देतो. पण येथून पुढे असे करू नका. शिजवलेल्या तांदळाच्या पाण्याचेही अनेक फायदेही आहेत (Benefits of rice water). अनेक आजारांवर शिजवलेल्या तांदळाचे पाणी हे गुणकारी असल्याचे सिद्ध झालं आहे. हे पाणी केसांसाठी आणि त्वचेसाठी (Rice Water is good for health, skin and hairs) खूपच फायदेशीर मानले जाते. तर आज आपण शिजवलेल्या तांदळाच्या पाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया. तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. ते पाणी फेकण्याऐवजी प्यायल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फायदे होतील. शरीरातील अनेक समस्यांवर हे पाणी गुणकारी आहे. - शिजवलेल्या तांदळाच्या पाण्यात ब, क आणि ई जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे तुमचा थकवा दूर होतो आणि तुम्हाला उर्जा मिळते. - शिजवलेल्या तांदळाच्या पाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पाणी प्यायल्यानं शरीराला ऊर्जा मिळते. एकप्रकारे हे पाणी एनर्जी बूस्टर ड्रिंक म्हणून काम करतं. या पाण्यात मीठ आणि मिरपूड घातल्यास बर्‍याच समस्यांपासून आराम मिळतो. - तांदळाचं पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. हे वाचा -  वयाच्या तिशीनंतर निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश - तांदळाचं पाणी विषाणूजन्य तापावर औषध म्हणून काम तर करतंच, सोबत त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत करतं. - शिजवलेल्या तांदळाचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया योग्यरित्या काम करते. हे पाणी फायबरयुक्त असतं त्यामुळे पचनक्रिया सुधारते, असं म्हणतात. - तसंच हे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे कमी रक्तदाबाची समस्यादेखील दूर होते. शिजवलेल्या तांदळाच्या पाण्यामध्ये मीठ टाकून प्यायल्यास त्याचा अधिक फायदा (Rice Water Benefits) होतो. - डोक्यावरचे केस गळत असतील, पांढरे होत असतील किंवा वाढ खुंटली असेल तर त्यावर शिजवलेल्या तांदळाचे पाणी (Rice Water for hairs) हा एक चांगला पर्याय आहे. शिजवलेल्या तांदळाच्या पाण्याने या सर्व समस्या दूर होतात. काही दिवसांतच केसांशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळेल. केस चमकदार, मजबूत आणि घनदाट होतील. - यासोबतच त्वचा नितळ ठेवण्यासही याची मदत होते. हे वाचा -  कानात बोटं घालणं, पेनकिलर घेणं; तुमच्या अशा सवयीही तुम्हाला बहिरं करतील म्हणून कधीही निरुपयोगी समजून शिजवलेल्या तांदळाचे पाणी फेकून देऊ नका. या गुणकारी पाण्याचा योग्य वापर करा. (सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन किंवा सल्ला जरूर घ्यावा)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात