मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कानात बोटं घालणं, पेनकिलर घेणं; विचारही केला नसेल अशा तुमच्या या 5 सवयी तुम्हाला बहिरं करतील

कानात बोटं घालणं, पेनकिलर घेणं; विचारही केला नसेल अशा तुमच्या या 5 सवयी तुम्हाला बहिरं करतील

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

कमी वयातच बहिरेपणा येण्यास तुमच्या या सवयी कारणीभूत ठरू शकतात.

मुंबई, 11 डिसेंबर : मानवी शरीरातला प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो; पण ज्ञानेंद्रिय विशेष महत्त्वाची असतात. कान (Ear) हे महत्त्वाचं ज्ञानेंद्रियं आहे. कान हा संवेदनशील अवयव असून, त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. कानामध्ये बर्‍याच वेळा समस्या उद्भवतात आणि त्या वेदनादायक ठरतात. कानाचे पडदे हा अत्यंत संवेदनशील भाग असतो. त्यांना थोडी जरी इजा झाली तर बहिरेपण (Deaf) येण्याची शक्यता असते. हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या गगनभेदी आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्यास कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकतं. प्रसंगी ऐकू येणं अचानक बंद होऊ शकतं. अशी आणखीही अनेक कारणं (Causes Of Hearing Loss) आहेत, की ज्यामुळे बहिरेपण येऊ शकतं. ती कारणं कोणती हे जाणून घेऊ या. 'वेबदुनिया डॉट कॉम'ने याबद्दलची माहिती दिली आहे.

अनेक जण कानम घरच्या घरी स्वच्छ (Cleaning Ear) करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी कानात काडी, हेअरक्लिप, सेफ्टी पिन टाकून मळ (Earwax) बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. चुकीच्या पद्धतीने कान साफ केल्याने त्याचा परिणाम श्रवणयंत्रणेवर होतो. तसंच काही जणांना सतत कानामध्ये बोटं घालण्याची सवय असते. या सवयींनी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे असं करणं चुकीचं आहे. यामुळे तुम्ही बहिरे होऊ शकता.

हे वाचा - Safe Ear Cleaning: कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

गाडीला प्रेशर हॉर्न बसवणं आणि त्यांचा वापर करणं कानांसाठी धोकादायक आहे. यामुळेही बहिरेपण येऊ शकतं. तसंच दुसऱ्यांच्या कानांनाही त्रास होऊ शकतो. डीजे, पबमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. त्यामुळे तिथे जास्त काळ थांबणं धोकादायक असतं. या जोरदार आवाजामुळे कानांना इजा पोहोचू शकते. ढोल-ताशांच्या आवाजामुळेही कानाच्या पडद्याला छिद्रं पडू शकतात. यामुळे ऐकायला कमी येऊ शकतं. त्यामुळे कर्कश आवाज ( loud sounds) होत असलेल्या ठिकाणी वावरू नका. तेथून दूर जा.

अनेकदा काही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेता वेदनाशामक गोळ्या घेतल्या जातात; पण असं करू नये. वेदनाशामक गोळ्यांचे सेवन आपलं आपणच करणं हे बहिरं होण्याचं कारण ठरू शकते. काहींना तात्पुरता, तर काहींना कायमस्वरूपी त्रास होऊ शकतो. त्यामुळे अगोदरच काळजी घेणं केव्हाही चांगलं असतं. कानासंदर्भात कोणत्याही समस्या निर्माण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यावा.

हे वाचा - पूजेसाठीचा कापूर आहे बहुगुणी, या शारीरिक समस्या काही दिवसात होतील गायब

रोजच्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. बहिरेपणा आणि कानाशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचं आहे ते म्हणजे मोठ्या आवाजात संगीत ऐकणं (Loud Noise) बंद करणं. कमी ऐकू येत आहे असं वाटलं, तर लगेच तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.

First published:

Tags: Ear, Health, Lifestyle