नवी दिल्ली, 10 डिसेंबर : शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक वयात पौष्टिक आहार घेतला पाहिजे. मात्र, गेल्या काही दशकांतील जीवनशैलीतील बदलामुळे आता तरुण वयातच शरीराबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. पूर्वी आजारी पडण्याचे जास्त प्रमाण वृद्ध लोकांमध्ये होते, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. अनेक गंभीर आजार कमी वयात तरुणांना देखील होत आहेत. विशेषत: वयाच्या 30 वर्षानंतर आरोग्याबाबत जागरुक राहण्याची नितांत गरज बनली आहे. तुम्हीही 30 वय ओलांडले असेल, तर स्वादिष्ट खाण्यासोबतच आरोग्यदायी आहार घेण्याची (Foods For Over Thirty) गरज आहे.
रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा
1. ब्रोकोली -
ब्रोकोली हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचे भांडार आहे. रोजच्या आहारात या ब्रोकोलीचा समावेश केल्याने आपली हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. यामुळे शरीराला रोगांशी लढण्यास मदत होते.
2. लसूण -
लसूण हे खूप चांगले प्रतिजैविक मानले जाते, त्यामुळे शरीरातील सूक्ष्मजंतू नष्ट करण्यास मदत होते. रोजच्या जेवणात लसणाचा वापर केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासही खूप मदत होते.
3. मध - मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शतकानुशतके भारतात मधाचा वापर औषध म्हणून केला जात आहे. आजही ते तितकेच समर्पक आहे. मध अनेक आजारांवर फायदेशीर आहे. मध अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. बरेच लोक कॉस्मेटिक हेतूंसाठी देखील मध वापरतात.
हे वाचा - दिवसातील या वेळात कोरोना लस घेणं आहे अधिक प्रभावी; नवीन संशोधनातील निष्कर्ष
4. मासे (ऑईली फिश) - मासे हे प्रथिनांचे भांडार असल्याचे म्हटले जाते. तुम्ही जर मांसाहारी असाल, तर तुमच्या आहारात सॅल्मनसारख्या तेलकट माशांचा समावेश करा. याचा आरोग्यासाठी खूप फायदा आहे. शरीरात आवश्यक हार्मोन्स तयार होतात. यामुळे हृदय आणि मेंदूचे कार्य सुधारते. माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
हे वाचा - 10 आणि 16 डिसेंबरला मोठ्या ग्रहांचे परिवर्तन; या राशींच्या लोकांना दिसतील आश्चर्यकारक बदल
5. चिया बिया (Chia Seeds) - चिया बियाही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये फायबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे तिन्ही घटक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचे आहेत. चिया बियांमध्ये वनस्पती आधारित प्रथिने आहेत. ते खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घकाळ राहते. या बिया पचनाच्या दृष्टीनेही चांगल्या असतात.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips