मुंबई, 10 डिसेंबर : आजकाल शहरी भागासह ग्रामीण भागातही पाणी साठवण्यास आणि पिण्यास प्लास्टिकच्या बॉटल्स सर्रास वापरल्या जातात. हेच नाही तर अनेक लोकांची कॉमन सवय असते, की कोल्ड ड्रिंक किंवा विकत घेतलेलं पाणी पिल्यास रिकामी बॉटल घरी आणायची आणि त्यात पाणी साठवायचं. मात्र, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, की ही सवय केवळ पर्यावरणासाठी नुकसानकारक नाही तर यातून तुमच्या आरोग्यालाही इजा पोचते. प्लास्टिकच्या बॉटल्स विविध रासायनिक प्रक्रिया करून तयार केल्या जातात. या बॉटल्सच्या रिसायकलिंग अर्थात पुनर्वापराचीही एक विशिष्ट पद्धत असते. या तापमानाबाबतही विविध प्रकारे संवेदनशील असतात. यांना तुम्ही पाणी पिण्यास किंवा स्टोअर करण्यास वापरलं तर आरोग्याचं नक्कीच नुकसान होऊ शकतं. घातक रसायनांच्या संपर्कात येतं पाणी अनेक कंपन्या या दावा करतात, की त्या बीपीए फ्री प्लास्टिकचा वापर करतात. मात्र विविध प्रकारच्या प्लास्टिक बॉटल्स बनवण्यास विविध रसायनं वापरली जातात. ही रसायनं मानवी शरीरासाठी हानिकारक आहेत. ही बॉटल पाणी आणि उष्णतेच्या संपर्कात येते किंवा अनेक दिवस तिच्यात पाणी साठवलं जातं तेव्हा यातील घातक रसायनं पिण्याच्या पाण्यात मिसळतात. शरीरातील अंतर्स्रावी ग्रंथींना प्रभावित करतात. याचा प्रभाव आपल्या संप्रेरकांवर पडतो.
74 टक्के बॉटल्स असतात विषारी न्व्हायर्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात समोर आलं, की रोज 8 प्रकारच्या प्लास्टिकचं उत्पादन होतं. यात सर्व दाव्यांनंतरही 74 टक्के प्लास्टिक विषारी असल्याचं सिद्ध झालं. मात्र, लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्यानं प्लास्टिक बाटल्यांचा वापर केला जातो. हे वाचा - वजन कमी करायचंय? मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्तर पर्यावरणासाठी हानिकारक हे प्लास्टिक अक्षय म्हणजे विघटित न होणारे असते. यांना नष्ट करण्यासाठी खास प्रक्रियेची गरज असते. या बॉटल्स वापरून इथं-तिथं फेकल्या तर त्यांचं रिसायकलिंग नीट होत नाही. मग प्लास्टिकचा कचरा पृथ्वीवर वाढतो. प्लास्टिकऐवजी धातूच्या बाटल्या वापरणं योग्य असतं. हे वाचा - Ready To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका;संशोधकांचा धक्कादायक खुलासा गर्भवती महिला आणि मुलांसाठी हानिकारक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये दीर्घकाळ पाणी साठवलं गेलं तर त्यात ठेवलेलं पाणी पूर्णतः विषारी झालेलं असतं. गर्भवती महिला किंवा लहान मुलांनी हे पाणी पिल्यास त्यांच्या तब्येतीसाठी हे खूप हानिकारक ठरतं.