मुंबई, 11 जून : तुम्ही अनेकदा चेहऱ्याला वाफ दिली असेल, काही लोक हे घरी करतात. तर काही लोक हे पार्लरमध्ये गेल्यावर करतात. घरी वाफ घेताना बरेच लोक डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ घेताना दिसतात. असं म्हणतात की अशी वाफ घेतल्याने स्किन चांगली होते. पण या व्यतिरिक्त याचे फायदे तुम्हाला माहितीयत का? काही लोक वाफ घेताना गरम पाण्यात कडुलिंब, मीठ आणि लिंबू यांसारख्या गोष्टी टाकतात. हे उघड आहे की यामागे त्वचेशी संबंधित फायदे आहेत. शिवाय आज आम्ही वाफ घेण्यामागचे आणखी काही रहस्य उलगडणार आहोत. Shiny Hairs : केसांची हरवलेली चमक परत आणायचीये? मग कॉफी पावडर हेअर पॅक नक्की ट्राय करा स्कीन साफ होते जे लोक नियमित चेहऱ्यावर स्ट्रीम घेतात, त्यांच्या त्वचेची छिद्रे उघडतात ज्यामुळे घाण आणि मृत त्वचा बाहेर येते, विशेषत: ज्यांना ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी स्टीम घेणे हा त्यावर रामबाण उपाय आहे, यामुळे चेहरा स्वच्छ होतो. रक्ताभिसरण तुम्ही तुमच्या त्वचेची कितीही काळजी घेत असाल, परंतु काहीवेळा असे होते की ती निस्तेज आणि निर्जलित दिसू लागते, अशा परिस्थितीत, चेहऱ्यावर वाफ घ्या, ते त्वचेचे रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहे. मधूमेहाच्या पेशन्टसाठी नारळपाणी चांगलं की वाईट, यामुळे रक्तातील साखर वाढते का? हायड्रेशन काही वेळा पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा डिहायड्रेट होऊ लागते. त्वचेचे हायड्रेशन वाढवण्यासाठी तुम्ही फेस स्टीमिंग करावे जेणेकरुन चेहऱ्याचे हायड्रेशन कायम राहते, असे केल्याने तुमचा चेहरा चमकदार होईल. त्वचा तरुण दिसेल स्टीम घेतल्याने चेहऱ्यावर कोलेजन आणि इलास्टिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे आपला चेहरा तरुण आणि चमकदार दिसतो. सामान्यत: त्वचेची काळजी घेणारे तज्ञ आठवड्यातून 3 वेळा स्टीम घेण्याची शिफारस करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.