जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शरीर हेल्दी आणि मन शांत ठेवण्यासाठी उत्तम आहे Color Therapy

शरीर हेल्दी आणि मन शांत ठेवण्यासाठी उत्तम आहे Color Therapy

शरीर हेल्दी आणि मन शांत ठेवण्यासाठी उत्तम आहे Color Therapy

Color Therapy मध्ये शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळण्यासाठी विविध रंगांची मदत घेतली जाते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल : आतापर्यंत तुम्ही वॉटर थेरेपी, म्युझिक थेरेपीबाबत ऐकलं असेल मात्र कधी कलर थेरेपी (Color Therapy) बाबत ऐकलं आहे का? कलर थेरेपीमार्फत शरीर हेल्दी आणि मन शांत राहण्यासाठी मदत होते. शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळण्यासाठी विविध रंगांची मदत घेतली जाते. ही कलर थेरेपी काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत जाणून घेऊयात. काय आहे कलर थेरेपी? वैद्यकीय भाषेत याला क्रोमोपॅथी, क्रोमोथेरेपी म्हणतात. डॉक्टरांच्या मते, या थेरेपीमार्फत व्यक्तीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारलं जातं. जी लोकं तणावग्रस्त आहेत, त्यांचं डोकं शांत करण्यासाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. कलर थेरेपीत विविध रंगाचा समावेश केला जातो. हे वाचा -  वारंवार धुतल्याने हात झाले ड्राय, घरगुती उपायांनी पुन्हा होतील सॉफ्ट सॉफ्ट प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्त्व असतं. हिरवा रंग  हिरवा रंग सर्व रंगांमध्ये सर्वांत संतुलित मानला जातो. कलर थेरेपीमध्ये हिरव्या रंगाला सुरक्षित मानलं जातं. सामान्यपणे या रंगानेच या थेरेपीची सुरुवात होते. जेव्हा एखादी व्यक्ती उदास, निराश असेल तेव्हा हिरवा रंग मानसिक स्थिती सुधारतं. मात्र हिरवा रंग सौम्य असेल तर तो चिंतेत टाकू शकतो. लाल रंग लाल रंग अधिक उत्तेजक मानला जातो. वित्तीय स्वतंत्रता आणि भौतिक अस्तित्व यासारख्या भावनात्मक मुद्द्यांना प्रभावित करतो. याचा उपयोग जास्त करून शारीरिक उपचारासाठी केला जातो. कलर थेरेपीत लाल रंग रक्तपेशींची निर्मितीही करतो.  कलर थेरेपीत लाल रंगाचा वापर ज्यांची मानसिक स्थिती खूप गंभीर असते, त्यांच्यासाठी केला जातो. पिवळा रंग या थेरेपीत पिवळा रंग बुद्धी आणि समज वाढवण्याचं काम करतं. हा रंग तुम्हाला आनंदी ठेवू शकतो. तुमची बुद्धी आणि विवेक समोर आणतो. निळा रंग निळा असा रंग भावना व्यक्त करण्यात मदत करतो. निळा एक थंड रंग आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला शांत करण्यासाठी आणि आराम देण्यासाठी केला जाऊ शकतो. कलर थेरेपीत निळ्या रंगाचा वापर पित्त, ताप इत्यादी समस्यांशी लढण्यासाठी केला जातो. पर्पल रंग कलर थेरेपीत पर्पल रंगाचा वापर ज्ञान वाढवण्यासाठी होतो. सुंदरता, आध्यात्मिकता आणि आनंदाशी संबंधित हा रंग मानला जातो. कलर थेरेपीत या रंगाचा उपयोग सहसा डोकं आणि मानेवर केला जातो जेणेकरून ते शांत होतील. सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. हे वाचा -  Work from home मुळे थकवा, या टिप्स फॉलो करा आणि व्हा रिलॅक्स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात