लॉकडाऊनमुळे घर आणि ऑफिस दोन्ही कामाच्या जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतात आणि त्यामुळे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक थकवाही येतो. त्यामुळे घरातील जबाबदाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी वाटून घ्याव्यात.
वर्क फ्रॉम होम करताना बहुतेक लोकांचा वेळ ऑफिसच्या कामातच जातो. 9 तासांपेक्षा जास्त काम होतं, त्यामुळे थकवा येणं साहजिकच आहे. त्यामुळे ऑफिसचं काम एकाग्रतेने करा, जेणेकरून काम लवकर पूर्ण होईल आणि तुम्हाला स्वत:साठी पुरेसा वेळ मिळेल.
लॉकडाऊनमध्ये आपण दिवसभर ऑफिसचं काम घेऊन बसतो. ऑफिसप्रमाणे जेवणासाठी, चहासाठी पुरेसा ब्रेकही घेतला जात नाही. त्यामुळे हा छोटा-छोटा ब्रेक घ्या, जेणेकरून फ्रेश वाटेल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप. दिवसभर काम केल्यानंतर पुन्हा स्वत:ला मोबाइलमध्ये गुंतवून ठेवू नका तर पुरेशी झोप घ्या, जेणेकरून शरीर आणि मन दोघांनाही आराम मिळेल.