जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Benefits of Apple Tea : प्रकृतीच्या तक्रारी दूर ठेवायच्यात? प्या सफरचंदाचा चहा...!

Benefits of Apple Tea : प्रकृतीच्या तक्रारी दूर ठेवायच्यात? प्या सफरचंदाचा चहा...!

सफरचंदाचा चहा

सफरचंदाचा चहा

सफरचंद हे वर्षभर उपलब्ध असणारं फळ आहे. यामुळे ते नियमितपणे आहारात घेणं शक्य आहे. सफरचंदाचा चहा हा नक्की काय प्रकार आहे आणि त्याचा शरीरासाठी तो कसा फायदेशीर आहे हे जाणून घेऊ.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 23 नोव्हेंबर :   फळं, कडधान्य, डाळी, पालेभाज्या आदींमध्ये पोषक घटकांचं प्रमाण खूप असतं. नियमित व्यायाम, योगा आदींसोबत उत्तम आणि सकस आहार गरजेचा ठरतो. दररोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरी उपचारांची गरज भासत नाही. कारण, सफरचंदामध्ये पोषक तत्त्वांचं प्रमाण खूप आहे. नियमित सकस आहार घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सक्षम राहते. काही जणांना सकाळी चहा घेण्याची सवय असते, तर काही जण केवळ गरम पाणी किंवा दूधच घेतात. सफरचंदाचा चहा घेणं प्रकृतीसाठी उत्तम ठरतं, हे माहिती आहे का? त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या. सफरचंद हे वर्षभर उपलब्ध असणारं फळ आहे. यामुळे ते नियमितपणे आहारात घेणं शक्य आहे. सफरचंदाचा चहा हा नक्की काय प्रकार आहे आणि त्याचा शरीरासाठी तो कसा फायदेशीर आहे हे जाणून घेऊ. डायबेटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त सफरचंदाच्या चहामध्ये असणारी पोषक द्रव्यं रक्तातल्या साखरेचं प्रमाण संतुलित ठेवतात. यासाठी डायबेटीसच्या रुग्णांनी नियमितपणे सफरचंदाच्या चहाचं सेवन करणं आवश्यक आहे. हा चहा घेतल्याने बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. तसंच सफरचंदाचा चहा पिण्याने पचनशक्तीही सक्षम होते. हेही वाचा - वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटीही करतात याचा वापर; काय आहे MCT ऑइल? वजनवाढीची समस्या ठेवते नियंत्रणात सफरचंदाचा चहा पिणं हा वजनवाढीच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहतं. नियमित व्यायाम पूर्ण झाल्यावर सफरचंदाचा चहा घेणं उपयुक्त ठरतं. सफरचंदाचा चहा पिण्याने केवळ वजनवाढीस अटकाव होत नाही, तर शरीराची इम्युनिटीही खूप वाढते. शरीर निरोगी राहण्यास मदत होते. सफरचंदातल्या फ्लॅवोनॉइड्समुळे डोळ्यांची निगा राखली जाते. नजर चांगली राहते. ज्यांना दृष्टिदोष असेल, त्यांनी नियमितपणे सफरचंद खाणं किंवा सफरचंदाचा चहा पिणं उपकारक ठरतं. कसा बनवाल सफरचंदाचा चहा? सफरचंदाचा चहा तयार करण्यासाठी लिंबाचा रस, दालचिनी पावडर आणि सफरचंदाच्या छोट्या फोडी घ्याव्यात. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात दालचिनी पावडर आणि सफरचंदाच्या फोडी घालून 5 ते 7 मिनिटं मध्यम आचेवर हे मिश्रण नीट शिजवून घ्यावं. जेव्हा हे पाणी आटून निम्मं होईल तेव्हा ते गाळण्याने गाळून घ्यावं. त्यानंतर यात लिंबाचा रस घालावा. यानंतर हा सफरचंदाचा चहा घ्यावा. यामुळे नक्कीच फरक जाणवेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: apple , lifestyle , tea
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात