मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटीही करतात याचा वापर; काय आहे MCT ऑइल?

वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटीही करतात याचा वापर; काय आहे MCT ऑइल?

काय आहे MCT ऑइल?

काय आहे MCT ऑइल?

तज्ज्ञांच्या मते, एमसीटी तेलापासून बनवलेल्या गोष्टी फार लवकर पचतात. याशिवाय ते फॅटी लिव्हरमध्ये केटोन्समध्ये रूपांतरित होते, त्यानंतर ते ऊर्जा म्हणून वापरले जाते. तुम्हाला माहितीये बॉलिवूडचे काही सेलिब्रिटीदेखील निरोगी आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी या तेलाचा वापर करतात.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 23 नोव्हेंबर : लोक वजन कमी करण्यासाठी किटो डाएट फॉलो करतात. तुम्हीदेखील त्यापैकी एक असाल, तर तुम्ही MCT ऑइलबद्दल ऐकले असेल. जे लोक कॉफीचे शौकीन आहेत, ते जेव्हा एखाद्या कॉफी शॉपमध्ये जातात. तेव्हा त्यांना MCT चा पर्यायही दिला जातो. MCT म्हणजे मिडीयम चेन ट्रायग्लिसराइड. MCT तेल हे एक सप्लिमेंट आहे, जे खोबरेल तेलावर प्रक्रिया केल्यानंतर काढले जाते. त्यात MCT असते.

तज्ज्ञांच्या मते, एमसीटी तेलापासून बनवलेल्या गोष्टी फार लवकर पचतात. याशिवाय ते फॅटी लिव्हरमध्ये केटोन्समध्ये रूपांतरित होते, त्यानंतर ते ऊर्जा म्हणून वापरले जाते. तुम्हाला माहितीये बॉलिवूडचे काही सेलिब्रिटीदेखील निरोगी आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी या तेलाचा वापर करतात. E Times ने दिलेल्या माहितीनुसार, मलायका अरोरा आणि शिल्पा शेट्टीसारखे बी-टाउन सेलिब्रिटीदेखील या तेलावर विश्वास दाखवतात.

Weight Loss : वजन कमी करायचंय? मग हे काळे पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवे

वजन कमी करते

नारळाच्या तेलासारख्या एमसीटी तेलांमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात, त्याचे दररोज सेवन केल्याने ऊर्जेची पातळी वाढते आणि कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया गतिमान होते. एका अभ्यासानुसार, दररोज सुमारे 15-30 ग्रॅम MCT ऑइलचे सेवन केल्याने 5 टक्के चरबी बर्न करू शकते. म्हणजेच रोज सुमारे 120 कॅलरीज. एमसीटी तेल पोट भरल्याची भावना निर्माण करते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

स्टाइलक्रेजच्या मते, एमसीटी तेल हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. MCT तेलाने स्वयंपाक केल्याने खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलला प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे हृदय नेहमी निरोगी राहते.

मधुमेहासाठी फायदेशीर

जे लोक जेवणात MCT तेलाचा वापर करतात, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नेहमी नियंत्रणात राहते. याशिवाय टाईप 2 मधुमेहाची तक्रार असलेल्यांसाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते.

शरीरात ऊर्जा वाढवते

एमसीटी तेल वापरणार्‍या लोकांच्या शरीरात केटोन्स ऊर्जा अबाधित राहते. यामुळे पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे शरीरात कमजोरी येत नाही.

MCT तेल कसे वापरावे

- MCT तेल कोणत्याही खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये वापरले जाऊ शकते.

- एमसीटी तेल कॉफीमध्ये मिसळून प्यावे.

- एमसीटी तेल सॅलड बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते.

- तुम्ही प्री-वर्कआउट ड्रिंक्स किंवा स्मूदी बनवण्यासाठी MCT तेल वापरू शकता.

- एमसीटी तेलाचा केटोजेनिक आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

तुम्ही कधी ग्रीन कॉफी प्यायलात? लोकांना वेड लावणाऱ्या या कॉफीचे फायदे वाचून थक्क व्हाल!

वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

- एका दिवसात 1-3 चमचे MCT तेलाचा वापर योग्य मानला जातो.

- सुरुवातीला एमसीटी तेल फक्त अर्धा चमचा वापरा.

- एकावेळी एमसीटी तेलाचा जास्त वापर केल्यास पचन बिघडू शकते.

- एमसीटी तेलाचा उच्च डोस कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकतो.

- एमसीटी तेलाचा वापर मर्यादित प्रमाणातच करा.

First published: