Home /News /lifestyle /

घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याचं असं कराल स्वागत, कोरोनाकाळात विशेष खबरदारी महत्त्वाची

घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याचं असं कराल स्वागत, कोरोनाकाळात विशेष खबरदारी महत्त्वाची

संशोधनानुसार गर्भधारणेनंतर 10 किलोने वजन वाढलेल्या 49% महिलांनी मुलांना जन्म दिला आहे. तर 20 किलोने वजन वाढणाऱ्या 52.5% महिलांनी मुलांना जन्म दिला. तर 30 किलो वजन वाढलेल्या महिलांमध्ये 54 % महिलांनीही मुलांना जन्म दिला.

संशोधनानुसार गर्भधारणेनंतर 10 किलोने वजन वाढलेल्या 49% महिलांनी मुलांना जन्म दिला आहे. तर 20 किलोने वजन वाढणाऱ्या 52.5% महिलांनी मुलांना जन्म दिला. तर 30 किलो वजन वाढलेल्या महिलांमध्ये 54 % महिलांनीही मुलांना जन्म दिला.

Preparations For Newborn at Home-डिलिव्हरी (Delivery)नंतर,नवजात बाळाला (Newborn Baby)दवाखान्यातून घरी नेण्यापूर्वी काही महत्वाची तयारी करणं आवश्यक आहे. जेणेकरून बाळाला घरी नेल्यावर कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत. त्यासाठी घरी कोणती तयारी करणं आवश्यक याची माहिती असायला हवं.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 23 मे: बाळाचे आईबाबा होणं हे स्वप्न अनेक कपल्सचं असतं. हे स्वप्न जगताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याकरता विशेष खबरदारी घेणंही आवश्यक आहे. प्रेग्नन्सीदरम्यान (Pregnancy) ज्या प्रकारे पालक आणि कुटूंबातली माणसं जशी बाळ या जगात येण्याची आतुरतेने वाट पाहतात, तितकीच प्रतीक्षा, डिलिव्हरीनंतर बाळं हॉस्पिटल (Hospital) मधून घरी येण्याची केली जाते. बर्‍याच वेळा एक्साईटमेन्ट (Excitement) मुळे किंवा पहिल्यांदा पालक बनण्याच्या आनंदात बाळ घरी आल्यावर त्याची काळजी घेण्यासाठी किंवा गरजेपोटी काही गोष्टी करणं गरजेचं असतं हेच काही पालक विसरून जातात. काही कुटूंबात बाळासाठी तयारी आधीच सुरु होते. पण, कधीकधी काही अडचणींमुळे बाळाला हॉस्पिटलमधून घरी नेण्याआधी तयारी करायची राहिली असे तर, बाळ घरी आल्यावर काही अडचणी येऊ शकतात त्या टाळण्यासाठी महत्वाची माहिती घेऊयात. (हे वाचा- WTC फायनलच्या पहिल्याच दिवशी टीम इंडिया रचणार इतिहास!) रुम आणि बेडची स्वच्छता डिलिव्हरीनंतर बाळाला हॉस्पिटमधून घरी नेण्यापूर्वी (Before taking the Baby home from the Hospital after Delivery) बाळाला ज्या रुममध्ये ठेवावयाचं आहे त्या रुमची साफ-सफाई करुन घ्या. रुम स्वच्छ करण्याबरोबर सॅनिटाईज करणं आवश्यक आहे. त्यामुळे बाळाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची भीती कमी होते. ज्या बेडवर बाळाला ठेववायचं आहे. तो बेड स्वच्छ करुन सॅनिटाईज (Sanitize) करा. रुम मधलं इतर सामान आणि पडदेही स्वच्छ करावेत. कोरोना काळात तर स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आरामदायक कपडे आणि बिछाना आपल्याला बाळासाठी आरामदायक कपडे (Cloths) आणि मऊ बेड (Bed)चीही व्यवस्था करावी. बाळासाठी,आरामदायक सुती कपड्यांचे (Cotton cloths) काही जोड आणि मऊ बेड तयार करा. जेणेकरून बाळं घरी आल्यावर त्याला त्याच बेडवर ठेवता येईल. उन्हाळ्यासाठी चादर आणि हिवाळ्यासाठी एक ब्लँकेटही घेऊन ठेवावा. बाळाला पाळण्यात ठेवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचीही व्यवस्था करुन ठेवावी. (हे वाचा- मुलीला पदवीधर झालेलं पाहून शिल्पा शिरोडकर झाली भावुक; फोटो शेअर करत म्हणाली...) बाळासाठी आवश्यक सामान नवजात बाळाची त्वचा अतिशय संवेदनशील असते. कोणत्याही प्रकारचा संसर्ग (Infection) टाळण्यासाठी स्वच्छ टॉवेल्स, बेबी सोप,बेबी मसाज ऑईल,बेबी लोशन,बेबी पावडर,फिडिंग बॉटल अशा गोष्टी गोळा करुन स्वच्छ करुन ठेवणं आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला गरजेच्या वेळी शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही. बाळाचं डासांपासून संरक्षण होण्यासाठी मच्छरदानीची व्यवस्था करावी. डॉक्टरांनी काही औषध लिहून दिली असतील तर, तिही आणून ठेवावीत. आईसाठी आवश्यक गोष्टी बाळाबरोबर बाळाच्या आईसाठी काही सामानांची आवश्यकता असते. त्याची तयारीही आधीच केली पाहिजेत. फीडिंग गाउन, फीडिंग ब्रा आणि ब्रेस्ट पंप्ससारख्या वस्तू आधीच घरी आणून ठेवलं पाहिजे. आईसाठीही डॉक्टरने  एखादं औषध दिलं असेल तर, तिही आणून ठेवणे चांगलं जेणेकरून वेळेवर औषध घेता येऊ शकतील. (हे वाचा-अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोशुटने दिला फायर अलर्ट; बोल्ड अदा पाहून तुम्हीही व्हाल..) मास्क आणि सॅनिटायझर्स कोरोनाकाळात आता सुरक्षेसाठी आणखी काही गोष्टींची तयारी करायला हवी. मास्क आणि सॅनिटायझर(Sanitizer) आधीच घरी आणून ठेवणं आवश्यक आहे. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आई किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने प्रत्येक वेळी हाताला सॅनिटायझल लावलं पाहिजे. तर, मास्क वापरणंही आवश्यक आहे. आई बाळाला स्तनपान करताना मास्क लाऊ शकते किंवा बाळाला आंघोळ घालताना, हातात घेताना इतरांनीही मास्क घालावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Baby hospitalised, Coronavirus, Pregnancy, Pregnant woman

    पुढील बातम्या