मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बीटाच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम, खाण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

बीटाच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम, खाण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस पोलंडच्या संशोधकांच्या मते, बीटमधील अँटीऑक्सिडेंट बेटालेन डीएनएचे नुकसान कमी करण्यास आणि यकृताला कार्सिनोजेनमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास फायदेशीर आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस पोलंडच्या संशोधकांच्या मते, बीटमधील अँटीऑक्सिडेंट बेटालेन डीएनएचे नुकसान कमी करण्यास आणि यकृताला कार्सिनोजेनमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास फायदेशीर आहे.

बीट हे लाल रंगाचं कंदमूळ आहारात असावं आणि त्याचे फायदे आहेत असं आयुर्वेदात सांगितलंय पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत.

नवी दिल्ली, 20 डिसेंबर: आपल्याकडे भारतात आहाराला प्रचंड महत्त्व देण्यात आलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न खाता तसंच तुम्ही घडता असंही म्हटलं जातं. त्यामुळे उत्तम आहार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण घरगुती पदार्थ खायलाही खूप महत्त्व देतो. शक्यतो जंक फूड (Junk Food) टाळतो जेणेकरून आपलं शरीर तंदुरुस्त रहावं. ही सगळी आहाराची पद्धत भारतात आयुर्वेदानुसार पाळली जाते. मग आपल्या रोजच्या जेवणात असणारे मसाले असोत की आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपचार असोत सगळं आयुर्वेदाशी (Ayurveda) जोडलेलं आहे. बीट हे लाल रंगाचं कंदमूळ आहारात असावं आणि त्याचे फायदे आहेत असं आयुर्वेदात सांगितलंय पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत. याबाबतचं वृत्त झी न्यूजनं दिलं आहे.

आयुर्वेदात बिटाला सुपरफूड म्हटलं आहे. बिटात प्रचंड मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वं असल्यामुळे डाएटिशियन पण त्याचा आहारात समावेश करायला सांगतात. पण इतकं गुणकारी असूनही अनेकदा बीट खाणं आरोग्याला हानिकारकही ठरू शकतं. खरं तर बीट (Beetroot) खाणं त्याचा ज्युस पिणं हे आरोग्याला चांगलंच मानलं जातं. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीरातील पेशी मजबूतही होतात. पण त्याचे काही दुष्परिणामही माहीत असायला हवेत.

हेही वाचा-  सकाळच्या नाश्त्यामध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

 बिटाच्या सेवनाने होणारे तोटे अनेकांना माहीत नसतात. बीट खाण्यामुळे जसे शरीराला फायदे होतात तसेच तोटेही होतात. बिटामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रेट असतं. ते अतिप्रमाणात खाल्लं किंवा त्याचा रस खूप जास्त प्यायलात तर तुमच पचनक्रिया (Digestion) बिघडू शकते. तसंच जर बीट कुठल्याही पद्धतीनी जास्त प्रमाणात पोटात गेलं तर पोटात मुरडा उठणं किंवा घसा खवखवणं असे त्रासही जाणवू शकतात. नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्यामुळे गरोदर महिलांनी बीट कमी प्रमाणात खावं असं त्यांना सल्ला दिला जातो.

बीट अधिक प्रमाणात खाल्लं तर मूत्रपिंडाशी (Kidney) संबंधित विविध आजार होऊ शकतात. तसंच किडनी स्टोन (Kidney stone) होण्याचीही शक्यता असते. हे परिणाम महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे थोडा त्रास झाला की लगेचच बीट खाणं थांबवा.

बीट जास्त खाल्ल्याने तुमच्या यकृतावरही (Liver) दुष्परिणाम होऊ शकतात. बिटामध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात ते सगळे यकृतात जाऊन अडकतात. त्यामुळे यकृताला फटका बसू शकतो.

बीट अति खाल्ल्याने हाडांनाही फटका बसतो. बिट खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. खरं तर कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात पण बिटामुळे हे कॅल्शियम कमी होतं आणि त्रास होऊ शकतो.

हेही वाचा- कॅन्सरवरील उपचारांमुळे होतो सेक्स लाईफवर परिणाम? महिलेनं सांगितला वाईट अनुभव

 अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की बीट खाणं हे जसं शरीरासाठी पोषक आहे तसंच ते जास्त खाल्लं तर घातकही ठरू शकतं. त्यामुळे बीट पूर्णपणे आहारातून काढून टाका असं म्हणणं नाही पण ते प्रमाणातच सेवन करा म्हणजे तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहील.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle