मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सकाळच्या नाश्त्यामध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

सकाळच्या नाश्त्यामध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

morning breakfast

morning breakfast

दिवसाच्या सुरुवातीला केला जाणारा नाश्ता (Breakfast)आपल्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे सकाळी न चुकता नाश्ता केला पाहिजे.

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : सध्या प्रत्येकाची लाईफस्टाईल (Lifestyle) एकदम धकाधकीची झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध गोष्टींमध्ये आपण अडकून राहतो. आपल्या बिझी शेड्युलमुळे खाण्यापिण्याकडे (Diet) नीट लक्ष देता येत नाही. काहीजण पुरेशा वेळेअभावी दिवसाच्या सुरुवातीला केला जाणारा नाश्ताही (Breakfast) स्कीप करतात तर, काहीजण एकदम उशिरा नाश्ता करतात. मात्र, ही गोष्ट आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दीर्घकाळासाठी जर आपण सकाळचा नाश्ता करणं टाळलं तर आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतात. दिवसाच्या सुरुवातीला केला जाणारा नाश्ता आपल्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. आपण जर पोटभर नाश्ता केला असेल तर दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. त्यामुळे सकाळी न चुकता नाश्ता केला पाहिजे. नाश्त्यामध्ये शरीराला जास्तीत जास्त पोषण देणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत.

शरीराला पोषण देणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत असा सल्ला दिला की, अनेकांना प्रश्न पडतो नेमकं काय खावं? काही गोष्टी अशा आहेत ज्या सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यानं जास्त फायदा होतो. त्यांच्यापासून मिळणारी पोषण मुल्ये अधिक चांगल्या पद्धतीनं शरीराला मिळतात.

लिंबू पाणी

वजन कमी करण्यासाठी लिंबू (Lemon) पाणी अतिशय उपयुक्त आहे, ही गोष्ट जवळपास सर्वांना माहिती आहे. मात्र, त्याचे इतरदेखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कोमट पाण्यात अर्धा लिंबू (Lemon) आणि थोडा मध (Honey) मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास तुमची पचन क्रिया सुधारते. लिंबू शरीरातील विषारी पदार्थ (Toxic substances) काढून टाकण्याचं काम करतं. म्हणून तुमची पचनसंस्था (Digestive system) निरोगी राहते.

मनुक्यांचं पाणी

मनुका (Raisins) हा सुक्यामेव्यातील (Dryfruits) एक लोकप्रिय घटक आहे. काळी द्राक्षं सुकवून मनुके तयार करतात. आंबट-गोड चव असलेला मनुका बहुतेकांना आवडतो. मनुका आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दररोज सकाळी मनुके भिजवलेलं पाणी (Raisins water) प्यायल्यास पोटाच्या विविध समस्या दूर होतात.

बदाम

बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स (Proteins) असतात. त्यामुळे बदाम (Almonds) खाल्ल्यानं स्नायू मजबूत होण्यास मदत होते, असं म्हणतात. बदाम खाण्याच्या विविध पद्धती आहेत. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम दररोज सकाळी खाल्यास शरीराला चांगली पोषणमुल्ये मिळतात. याशिवाय बदाम शेक (Almond Shake) तयार करूनही तुम्ही तो पिऊ शकता.

पपई

पपई (Papaya) हे एक गोड फळ आहे जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. पपईमुळे पोट निरोगी राहतं आणि रोगप्रतिकारशक्तीही (Immunity) वाढते. पपईमध्ये फायबर, फॉलेट आणि जीवनसत्त्वे इत्यादी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. हे घटक तुमचं यकृत डिटॉक्स करतात आणि हार्ट अॅटॅक, कॅन्सर यांसारख्या आजारांचा धोका कमी करतात. पपई खाल्ल्यानं डायबेटिस असलेल्या लोकांच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते.

दालचिनी

प्रामुख्यानं मसाल्यांमध्ये वापरली जाणारी दालचिनी (Cinnamon) आरोग्यासाठी चांगली मानली जाते. सकाळी मधासोबत दालचीनी खाल्ल्यास शरीराला विविध प्रकारचे फायदे होतात. रिकाम्या पोटी मध आणि दालचिनीचे पाणी प्यायल्यास वजनही कमी करता येतं.

वरील सर्व पदार्थांचा आपल्या सोयीनुसार सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle