Home /News /lifestyle /

गरज नाही टेरेसची! ऑगस्ट महिन्यात कोबी,गाजर,बीट लावा कुंडीत

गरज नाही टेरेसची! ऑगस्ट महिन्यात कोबी,गाजर,बीट लावा कुंडीत

घरीच काही भाज्या (Vegetable) लावाच्या असतील तर, ऑगस्ट (August) महिना सगळ्याच उत्तम आहे. आजच लागवड केली तर, नवरात्रीच्या काळात घरच्याच भाज्या वापरता येतील.

    नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात (Corona Period) बऱ्याच लोकांना आपले छंद पूर्ण करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे घरीच राहून लोक आपली अवड जपत आहेत काही लोक चित्रकला, विणकाम, लेखन अशा छंदामध्ये स्वताना गुंतवून घेत आहेत. बागकाम (Gardening) असाच एक छंद आहे जो बऱ्याच जणांना असतो. पण, शहरी भागात जिथे घरं फार लहान असतात किंवा घराच्या आजूबाजूला जागाच नसते. अशात किचन गार्डनिंग (Kitchen Gardening) हा पर्याय खूप उपयुक्त आहे. लोक घराच्या टेरेस आणि बाल्कनीमध्ये (Terrace & Balcony) भाज्या लावून वापरू शकतात. आजकाल हा ट्रेंडही (Trend) खूप आहे. त्यातच किचन गार्डनिंगसाठी ऑगस्ट महिना उत्तम आहे. या महिन्यात काही भाज्या चांगल्या येतात. हिवाळ्यात बाजारात हिरव्या पालेभाज्या जास्त मिळतात. कारण पाऊस चांगला सुरू झाला की, ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात भाज्यांची लागवड केली जाते. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात काही भाज्या चांगल्या येतात. (दूध पिताना एक छोटीशी चूक पडेल महागात; तुम्हालाही अशी सवय तर नाही ना?) मुळा मुळा लावण्यासाठी एखाद्या कुंडीत माती, वाळू, कॉकपीट आणि कंपोस्ट किंवा गांडूळ खत घ्या. आधी मुळाच्या बियांपासून रोपं तयार. त्यासाठी पेपर कपमध्ये माती भरा आणि त्यात दोन बिया टाकू ठेवा. त्यावर पाणी शिंपडा आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा. काही दिवसात या बियांपासून रोपं बाहेर येऊ लागतात, ही रोपं कुंडीत लावा. गरजेनुसार पाणी घाला आणि सूर्य प्रकाशात ठेवा. 90 दिवसांनी मुळा तयार होईल. बिट एका कुंडीत कॉकपीट, रेती आणि खत घाला. यात बिटच्या बिया लावा. त्यावर पाणी शिंपडा आणि सावलीत ठेवा. 2 ते 3 आठवड्यात रोपं उगवायला लागतील. 3 आठवड्यांनी रोपं मोठी होतील. त्यानंतर एका मोठ्या कुंडीत ही रोपं लावा. एक महिन्याने त्यावर फुलं दिसायला लागतात. 3 महिन्यांनी बिट काढू शकता. (2 मुलांच्या जन्मात 'इतक' असावं अंतर; दुसऱ्या प्रेग्नेन्सीचा विचार करण्याआधी वाचा) गाजर सर्वात आधी पॉटिंग मिक्स घालून कुंडी तयार करा. आता बोटाने समान अंतराने मातीमध्ये खड्डे करा. या खड्ड्यांमध्ये 1 ते 2 गाजराच्या बिया टाकून वरून थोडी माती घालून बिया झाकून ठेवा. यात वरून पाणी घाला. ही रोपं 15 दिवसात तयार होण्यास सुरवात होईल. पण, गाजराची रोपं वाढण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक आहे. अडीच महिन्यांनी गाजर कापणीसाठी तयार होतात. फ्लॉवर एखाद्या ग्रो बॅग किंवा कुंडीत पॉटिंग मिक्स घाला. तर, कागदाच्या लहान ग्रो बॅगही तयार करा. या ग्रो बॅग मोठ्या ग्रो बॅग किंवा कुंडीत समान अंतरावर ठेवा. या लहान ग्रो बॅगमध्ये बियाणं लावा. साधारणपणे 10-15 दिवसांनी बियांना कोंब येण्यास सुरवात होईल. नियमित पाणी घालत रहा. एका महिन्यात रोपं तयार होतील. ही झाडं आता वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावा. याला अडीच महिन्यात फ्लॉवर येतात. (ब्रेड, पराठा... नाश्त्यात हे 5 पदार्थ नकोच; वाढेल डोकेदुखी) कोबी कोबीच्या बिया किंवा घरी आणलेल्या कोबीच्या पानांपासूनही उगवता येतो. कोबीमध्ये काही कोंब दिसत असतील तर, ते कापावेत आणि कुंडीमध्ये लावावेत. यावर पाणी शिंपडावं आणि या कुंड्या उन्हातठेवाव्यात. दररोज पाणी घालावं. 2 आठवड्यांनी रोपं येतील. अडीच ते तीन महिल्यांनी कोबी तयार होतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gardening, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या