रक्षाबंधनच्या दिवसाची प्रत्येक भाऊ-बहिण वाट बघत असतात. बहिण या दिवशी भावाच्या हातावर राखी बांधून संरक्षण करण्याचं जणू वचनच घेते. भारतात हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्योतिष तज्ज्ञांच्यामते रक्षा बंधनाच्या दिवशी काही चुका अशुभ फळ देतात.
रक्ष बंधनाच्या दिवाशी भद्र काळ आणि राहु काळात राखी बांधू नये. या वर्षी रक्षा बंधनाच्या दिवशी भद्र काळ नसणार आहे पण, सकाळी 5 वाजून 16 मिनिटांपासून 6 वाजून 54 मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे. या काळात भावला राखी बांधू नये.
रक्षा बंधनच्या दिवशी भद्र काळ संपल्यानंतर रक्ष बंधन सुरू होणार आहे. राखी पौर्णिमा 5 वाजून 31 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे साडेपाच वाजण्याआधीच भावाला राखी बांधावी.
बाजारात सुंदर राख्या विकत मिळतात. पण, कधीकधी घरी आणल्यावर काही राख्या तुटतात. अशा तुटलेल्या राख्या पुन्हा जोडून वापरू नयेत. तुटकी राखी भावाला बाधू नयेत.
आता बाजारात प्लॅस्टिक वापरून तयार केलेल्या राख्या मिळतात. पण, प्लॅस्टिक केतूचा पदार्थ मानला जातो. त्यामुळे अपयश वाढतं असं म्हणतात. त्यामुळे या वर्षी प्लॅस्टिक असलेली राखी खरेदी करू नका.
राखीची सुंदर डिझाईन पाहतानाचं ती बाधंल्याने इजा होणार नाही याचीही काळजी घ्यावी. कारण, भावाला ही राखी लागली तर, जखम होऊ शकते.
या दिवशी भाऊबहिण एकमेकांना भेट वस्तू देतात. पण, ज्योतिष शास्त्रानुसार काही भेटवस्तू अशुभ असतात. आरसा, सुरी, केसांचे क्लिप, मिक्सर सारख्या वस्तू भेट म्हणून देऊ नयेत.
चप्पल, सॅन्डल, रुमाल या वस्तूही भेट म्हणून देऊ नयेत. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला बहिणींचं कारक मानलं गेलं आहे. त्यामुळे या ग्रहाशी संबंधीत भेट द्यावी. एखादे गॅझेट किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट करावी.