जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दाट-आकर्षक पापण्या बनवण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; डोळ्यांचेही आरोग्य सुधारेल

दाट-आकर्षक पापण्या बनवण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; डोळ्यांचेही आरोग्य सुधारेल

दाट-आकर्षक पापण्या बनवण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; डोळ्यांचेही आरोग्य सुधारेल

विरळ पापण्यांचं कारण शरीरातील हार्मोन्समधील बदल, कोरडेपणा, पोषणाचा अभाव असू शकतं. एवढंच नाही तर, कधीकधी स्वस्त आणि खराब मेकअप उत्पादनांचा वापर केल्यानं देखील वयोमानानुसार पापण्यांचे केस विरळ होत जातात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 मार्च : आपल्या पापण्या जाड आणि सुंदर असाव्यात, असं सर्वांनाच वाटत असतं. मात्र, काहींनाच ही नैसर्गिक देणगी लाभलेली असते. नैसर्गिकपणे डोळे आकर्षक दिसण्यामध्ये दाट पापण्यांचा (Diet for Thick And Strong Eye Lashes) मोठा वाटा असतो. तर, अशा सुंदर पापण्या मिळवण्यासाठी कोणते उपाय करता येतील, हे आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत. जाड पापण्यांना सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. अशा स्थितीत ज्यांच्या पापण्या दाट नसतात, ते यावर अनेक उपाय करतात. सहसा, स्त्रिया मेकअपदरम्यान डोळ्याच्या कर्लर्स आणि मस्कराच्या मदतीनं त्यांना जाड बनवतात. परंतु जर तुम्हाला त्या नैसर्गिकरित्या जाड करायच्या असतील तर आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल. विरळ पापण्यांचं कारण शरीरातील हार्मोन्समधील बदल, कोरडेपणा, पोषणाचा अभाव असू शकतं. एवढंच नाही तर, कधीकधी स्वस्त आणि खराब मेकअप उत्पादनांचा वापर केल्यानं देखील वयोमानानुसार पापण्यांचे केस विरळ होत जातात. एखादी वैद्यकीय समस्या किंवा उपचारांचा अतिरिक्त परिणाम हेही याचं कारण असू शकते. अशा परिस्थितीत आहारात काही गोष्टींचा समावेश करून पापण्या दाट करता येतात. याचा आहारात समावेश करा 1  मशरूमचे फायदे मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 3 मुबलक प्रमाणात आढळतं. याच्यामुळं पापण्या लांब आणि दाट होतात. व्हिटॅमिन बी रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतं आणि केरॅटिनचं उत्पादनही वाढवतं. यामुळं त्वचेच्या पेशींचं पुनरुत्पादन होण्यास मदत होते. यामुळं डोळ्यांच्या पापण्या जलद गतीनं वाढू लागतात. हे वाचा -  Almond oil: दोन थेंब बदाम तेल चेहऱ्यावर आणेल जबरदस्त ग्लो; फक्त असा करा वापर

  1. ड्राय फ्रूटस

सुका मेवा केवळ आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही, तर आपल्या डोळ्यांच्या पापण्यांसाठी देखील उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 मुबलक प्रमाणात असतं, जे डोळ्यांच्या पापण्यांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. या दोहोंमुळं पापण्या दाट होतात आणि त्यांची मुळंही मजबूत होतात.

  1. बीन्स

बीन्समध्ये फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन एच भरपूर असते. फॉलिक अॅसिड पापण्यांच्या वाढीस उत्तेजन देतं. तर, व्हिटॅमिन एच रक्ताभिसरण वाढवून केस गळण्यास प्रतिबंध करतं. हे वाचा -  मध आणि आवळा एकत्र खाणं आरोग्यासाठी चांगलं, जाणून घ्या फायदे

  1. फळं आणि भाज्या

व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असलेली फळं पापण्या लांब, जाड आणि मजबूत बनवण्याचं काम करतात. ते शरीरात कॉलिजन उत्पादन वाढवतात आणि डोळ्यांच्या पापण्यांना दाटपणा देण्याचं काम करतात.

  1. तृणधान्यं

वेगवेगळ्या धान्यांमध्ये असलेलं लोह आणि व्हिटॅमिन बी6  मेलॅनिनचं उत्पादन वाढवतं, जे एक विशेष रंगद्रव्य घटक आहे. त्याच्या चांगल्या उत्पादनामुळं, पापण्या बऱ्याच काळासाठी काळ्याभोर आणि दाट राहतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात