मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Health Tips: मध आणि आवळा एकत्र खाण्याचे फायदे माहित आहेत का?, जाणून घ्या

Health Tips: मध आणि आवळा एकत्र खाण्याचे फायदे माहित आहेत का?, जाणून घ्या

Benefits of Honey and Amla: आवळा आणि मधात अनेक प्रकारची पोषक तत्त्व असतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, तर मधामध्ये लोह मुबलक असतं.

Benefits of Honey and Amla: आवळा आणि मधात अनेक प्रकारची पोषक तत्त्व असतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, तर मधामध्ये लोह मुबलक असतं.

Benefits of Honey and Amla: आवळा आणि मधात अनेक प्रकारची पोषक तत्त्व असतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, तर मधामध्ये लोह मुबलक असतं.

नवी दिल्ली, 07 मार्च: मध (Honey) आणि आवळा (Amla) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आवळा हिवाळ्यात जास्त प्रमाणात मिळत असल्याने त्याचं सेवनही हिवाळ्यात अधिक केलं जातं. तर, मध शरीराचं अनेक समस्यांपासून संरक्षण करतो. आवळा आणि मधात अनेक प्रकारची पोषक तत्त्व असतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, तर मधामध्ये लोह मुबलक असतं. त्यामुळे या दोन्हीचं एकत्र सेवन केल्यावर त्याचे औषधी गुणधर्म वाढून शरीराला दुहेरी फायदा होतो. मध आणि आवळा एकत्र खाण्याचे काय फायदे आहेत, हे जाणून घ्या.

आवळ्यामध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिनं, ऊर्जा, कार्बोहायड्रेट (Carbohydrates), जस्त, तांबे, पोटॅशियम (Potassium), फॉस्फरस, नियासिन, रिबोफ्लेविन इत्यादी अनेक निरोगी पोषक घटक असतात. हे सर्व घटक मधामध्येदेखील असतात, तसंच त्यात फोलेट, सेलेनियम, सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (acid), जीवनसत्त्व B6, E, A आढळतात.

तुम्ही आवळ्याचा रसात मध मिसळून त्याचं सेवन करू शकता. यामुळे आवळ्याची तुरट, आंबट चवही निघून जाईल. बाजारात मिळणाऱ्या आवळा पावडरमध्ये थोडं मध घालून चाटल्याने खोकला बरा होतो. तुम्ही आवळा कच्चा, रस, चटणी बनवून किंवा इतर कोणत्याही चटणीमध्ये घालून खाऊ शकता. तर, मध त्वचेसाठी खूप फायदेशीर असून ते चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि स्वच्छ होतो. दह्यात (curd) मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्याचाही फायदा होतो.

मध आणि आवळ्याचं सेवन करण्याचे फायदे

आवळ्याचा वापर केस निरोगी ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे केला जात आहे. आवळा केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे केस मजबूतदेखील होतात. त्याचबरोबर मधामुळे टाळूशी संबंधित समस्या दूर होतात. मध कोंडा दूर करण्यास मदत करतो. त्यामुळे केस गळणं कमी होऊ शकतं.

त्वचेवर मध लावल्याने (honey for skin) त्वचा मुलायम, मॉइश्चराइज होते. यामध्ये असलेले अँटि-मायक्रोबायल घटक त्वचेला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून वाचवतात. अँटिइंफ्लेमेटरी तत्व इंफ्लेमेशन होण्याची समस्या दूर करते. त्याचबरोबर आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. आवळा, मधाचा वापरही अनेक आयुर्वेदिक औषधं आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर आवळा भरपूर प्रमाणात खा. व्हिटॅमिन सी असल्याने तो रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवतो. तसंच पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यात मदत करतो. मधाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत होते.हा शरीरात अँटिबॉडीजचं उत्पादन वाढवण्यास मदत करतो. अँटिबॉडीज अनेक प्रकारच्या विषाणू, बॅक्टेरियापासून शरीराचं संरक्षण करतात.

याशिवाय ते पचनशक्ती मजबूत करतात. कावीळ, दमा यांसारख्या आजारांमध्येही त्यांचं सेवन केल्यास फायदा होतो. परंतु, या दोन्हीचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला काही नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणात हे दोन्ही पदार्थ खावेत.

First published:
top videos

    Tags: Health Tips