मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सुंदर दिसण्यासाठी झोपण्याआधी लावलं क्रीम; सकाळी स्वतःचाच चेहरा पाहून तरुणी हादरली

सुंदर दिसण्यासाठी झोपण्याआधी लावलं क्रीम; सकाळी स्वतःचाच चेहरा पाहून तरुणी हादरली

ब्लिच करताना वापरल्या जाणाऱ्या फेशियल क्रिममुळे, ब्लिचमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲक्टिवेटरमुळे स्किनवर खाज येणं किंवा रॅशेस येणं असे त्रास होऊ शकतात.

ब्लिच करताना वापरल्या जाणाऱ्या फेशियल क्रिममुळे, ब्लिचमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲक्टिवेटरमुळे स्किनवर खाज येणं किंवा रॅशेस येणं असे त्रास होऊ शकतात.

आता आपला बिघडलेला चेहरा ठिक करायचा तरी कसा यासाठी तिने सोशल मीडियावर मदत मागितली आहे.

मुंबई, 05 जुलै : सुंदर दिसण्यासाठी बहुतेक लोक बरेच प्रयोग करत असतात. त्यासाठी चेहऱ्याची काळजी घेणारे आणि मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक जणी पार्लरमध्ये (Parlour) जाऊन सुंदर दिसण्यासाठी पैसे खर्च करतात, काही जण घरातल्या वस्तूंचा वापर करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. काही जणी महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स (Beauty Products) वापरतात. अनेकांना आपल्या त्वचेवर (Skin) प्रयोग (Experiments) करायची सवय असते; मात्र प्रत्येक प्रॉडक्ट आपल्या त्वचेला सूट होईल असं नसतं. असे प्रयोग कधी कधी महागात पडू शकतात. त्यामुळे त्वचेवर दुष्परिणामदेखील होऊ शकतात. त्यामुळे कोणतंही प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं.

आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे एक व्हायरल व्हिडिओ. लिलाह पार्सन्स (Lilah Parsons) ही रेडिओ प्रेझेंटर (Radio Presenter) आणि टिकटॉकर (Tiktok) आहे. तिने चांगल्या आणि तजेलदार त्वचेसाठी पहिल्यांदाच टॅन ड्रॉप्सचा (tan drops) वापर केला. मात्र, त्यानंतर जे झालं त्याने लिलाहला धक्का बसला.

आपल्या परिस्थितीचा अंदाज यावा म्हणून एका व्हिडिओत लिलाहने तिच्या चाहत्यांना टॅन ड्रॉप्स वापरल्यानंतरचा चेहरा दाखवला. त्या ड्रॉप्समुळे तिचा चेहरा नारिंगी रंगाचा झाला होता. तिच्या चेहऱ्याचा रंग मानेच्या रंगापेक्षा जास्त गडद झाला होता. लिलाहने रात्री झोपण्यापूर्वी हा टॅन ड्रॉप चेहऱ्यावर लावला होता; मात्र जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्याऐवजी नारिंगी रंगाचा झाला. कारण ते ड्रॉप्स फेक म्हणजेच बनावट होते. या ड्रॉप्सच्या वापरानंतर लिलाह तिचा चेहरा कुणाला दाखवू शकत नव्हती.

हे वाचा - अरे हे काय? महिलेचे कान साफ करताना जे सापडलं ते पाहून डॉक्टरही शॉक

लिलाहने तिच्या टिकटॉक अकाउंटवर याबद्दल माहिती दिली. फेक टॅन ड्रॉप्सचा वापर करू नका, असं आवाहन तिने केलं. हेल्प मी (#HELPME) या हॅशटॅग वापरून तिने लोकांकडून सल्ला आणि मदत मागितली. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये तिला सल्ले दिले. एका युझरने लिहिलं, की ‘तू ड्रॉप्सचे काहीच थेंब लावायला पाहिजे होते.’ काही युझरनी तिला चेहऱ्यावरचं टॅन हटवण्यासाठी लिंबू वापरण्याचा सल्ला दिला. लिलाहच्या या फसलेल्या प्रयोगाचा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

हे वाचा - हात आहे की हातोडा! फक्त कोपराने एका मिनिटात धडाधड फोडले 279 अक्रोड; पाहा VIDEO

त्यामुळे केस आणि चेहऱ्यावर कोणताही प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तसंच त्या प्रॉडक्ट्सच्या संभाव्य दुष्परिणामांची किंवा साइड इफेक्ट्सची माहितीदेखील असू द्या.

First published:

Tags: Beauty tips, Lifestyle