जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चेहऱ्याची अशी अवस्था नको असेल तर Beauty Treatment घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

चेहऱ्याची अशी अवस्था नको असेल तर Beauty Treatment घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

चेहऱ्याची अशी अवस्था नको असेल तर Beauty Treatment घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

एका अभिनेत्री आणि एका डॉक्टरची Beauty Treatment मुळे जशी अवस्था झाली, तशी तुमची होऊ देऊ नका.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 04 मार्च : सुंदर दिसावं असं कोणाला वाटत नाही? विशेषतः महिलांमध्ये तर याची विशेष ओढ अधिक असते. यामुळे अनेकदा महिला वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं (Beauty Products) वापरण्याबरोबरच ब्युटी पार्लरमध्येही (Beauty Parlor) जात असतात. काही महिला नियमितपणे पार्लरमध्ये जातात आणि केस, त्वचा, हात-पाय यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट (beauty treatments) घेतात. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करणं, चेहऱ्यावरील अनावश्यक लव काढून टाकणं, रापलेला चेहरा पुन्हा उजळवणं यासाठी काही खास ब्युटी ट्रिटमेंट घेतल्या जातात. काही वेळा अप्रशिक्षित लोकांकडून या ट्रिटमेंट करणं, चुकीची उत्पादनं वापरणं आदी प्रकारांमुळे भलताच परिणाम होऊन चेहरा सुंदर होण्याऐवजी विद्रुप झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतंच एका अभिनेत्रीला आणि डॉक्टरलादेखील अशी ब्युटी ट्रिटमेंट महागात पडली आहे. सिलचरमधील डॉ. विनिता यांनी डी-टॅन आणि ब्लीच करून घेतलं. त्यानंतर त्यांना  चेहऱ्यावर गरम तेल टाकल्यासारख्या वेदना होत होत्या. त्या पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्यांच्या चेहऱ्यावर बर्फ लावला परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डॉ. विनिता यांचा चेहरा सोलवटून निघाला होता. तर हैदराबादमध्ये एका टीव्ही अभिनेत्रीनंही चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ब्युटी ट्रिटमेंट घेतली आणि तिचा चेहरा अधिक गडद झाला. तिनं तिचं नैसर्गिक सौंदर्यही गमावलं. अशी वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घ्या. हे वाचा -  पार्लरमध्ये चेहऱ्याची लागली वाट; कुणाचा चेहरा भाजला तर कुणाची त्वचा काळी पडली अपोलो हॉस्पिटलचे (Apollo Hospital) त्वचारोग तज्ज्ञ (Dermatologist) डॉ. देवेंद्र महाजन यांनी सांगितलं, “ब्युटी पार्लर किवा सलूनमध्ये जाऊन कोणतीही ब्युटी ट्रिटमेंट घेण्यापूर्वी आपल्या त्वचेचा (Skin Type) प्रकार जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते. काही वेळा अशा ब्युटी ट्रीटमेंटमुळे त्वचा जळते किंवा अॅलर्जी येऊ शकते. अनेकदा पार्लरमध्ये जाऊन फेशियल, स्कीन स्पा, ब्लीच आदी ट्रिटमेंटनंतर त्वचा लाल होते, अनेकांना जळजळ, त्वचा ताणल्यासारखी वाटणे अशा तक्रारी जाणवतात. अनेकांना अॅलर्जी होते” हे वाचा -  सावधान! 2050 पर्यंत ऐकण्याची क्षमता होणार कमी; WHOचा इशारा “कोणत्याही ब्युटी पार्लर जाऊन कोणतीही ब्युटी ट्रिटमेंट घेण्यापूर्वी त्याबद्दल माहिती घ्या. अनेकदा काही ठिकाणी कर्मचारी वर्ग अनुभवी नसतो. त्यांना त्वचेचे प्रकार, त्यासाठी योग्य उत्पादनं याची माहिती नसते. त्यामुळे अयोग्य प्रसाधने वापरली जाऊ शकतात. अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त क्रीम लावलं जातं, त्याचाही वाईट परिणाम होतो. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांबाबत (Beauty Products) खात्री करून घेणं आवश्यक आहे”, असा सल्लाही डॉ. महाजन यांनी दिला. काय काळजी घ्याल ब्युटी ट्रिटमेंट घेण्यापूर्वी त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांबाबत माहिती घ्या. माहितीच्या आणि प्रसिद्ध पार्लरमध्येच जा. तुम्ही घरी सौदर्य प्रसाधने आणून वापरणार असाल तरीही ती नीट खात्री करून घ्या. कोणतंही उत्पादन थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या त्वचेवर लावून पहा. त्यामुळं ते उत्पादन तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, किंवा त्याचे काही दुष्परिणाम होतात का हे आधीच लक्षात येईल आणि चेहऱ्याचं नुकसान टाळता येईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात