मुंबई, 10 सप्टेंबर : सोशल मीडियाचा वापर अनेक जण व्यावसायिक कारणांसाठी करतात. पण तुम्ही जर नोकरी करत असाल तर मात्र सोशल मीडियाच्या वापरावर बंधनं येतात. यासाठीच करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये 40 टक्के भारतीयांनी याला सहमती दर्शवली आहे. सोशल मीडियाच्या अकाउंटवर पर्सनल फोटो किंवा माहिती पोस्ट करणं ठीक आहे पण अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया पॉलिसी बनवली आहे. त्यानुसार कोणत्याही वादग्रस्त विषयाबद्दल पोस्ट करण्याला मनाई आहे. कंपन्यांच्या याच धोरणामुळे बहुतांश कर्मचारी राजकीय, सामाजिक घटनांवर मोकळेपणे व्यक्त होत नाहीत. तुमच्या कंपनीची पतही महत्त्वाची आपण अनेक सेलिब्रेटी किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यक्तींना एखाद्या विषयावर भाष्य करताना पाहतो. त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांना तेच जबाबदार असतात. पण तुम्ही जर नोकरी करत असाल तर मात्र तुमच्यासह त्या कंपनीची पतही खालावण्याचा धोका असतो, असं McAfee चे इंजिनिअरिंग अँड मॅनेजिंग डायरेक्टर वेंकट कृष्णापूर यांनी सांगितलं. कंपनीची प्रतिमा सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचं अकाउंट वेळोवेळी तपासून पाहावं लागतं. एखाद्या कर्मचाऱ्याने जर त्याच्या कंपनीबद्दल नकारात्मक पोस्ट टाकली तर कंपनीच्या दबावामुळे ती डिलिटही करावी लागते, असं 25 टक्के लोकांनी सांगितलं. आपलं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं तो भाग नेमका आहे तरी कसा? त्याचबरोबर आपलं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक क्षेत्र हे दोन्ही वेगळं ठेवावं, असंही मत अनेकांनी व्यक्त केलं. असा मध्यमबिंदू काढणाऱ्यांचं प्रमाण 46 टक्के आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात कुणाच्याही दबावाला बळी पडता सर्वंकष भान ठेवूनच वागायला हवं यावर सगळ्यांचंच एकमत आहे. =============================================================================================== मराठी सेलिब्रिटींनी केला बदलाचा श्रीगणेशा, पाहा हा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.