जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ पुरुषांसाठी घातक, फर्टिलिटीवर होऊ शकतो वाईट परिणाम

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ पुरुषांसाठी घातक, फर्टिलिटीवर होऊ शकतो वाईट परिणाम

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ पुरुषांसाठी घातक, फर्टिलिटीवर होऊ शकतो वाईट परिणाम

बऱ्याचदा तरुणांमध्ये इंफर्टिलिटीची समस्या दिसते. एनसीबीआयच्या सर्वेक्षणानुसार, सध्या वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी 40-50 टक्के प्रकरणे हे पुरुषांच्या शुक्राणूंची खराब गुणवत्ता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 डिसेंबर : उन्हाळ्यात आपण काळात नकळत बऱ्याच चुका करतो. त्यामुळे आपल्याला आरोग्याची हानी होते. अशीच एक गोष्ट म्हणजे गरम पाण्याने आंघोळ करणे. तुम्ही तरुण असाल आणि तुम्ही खूप गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुष त्यांच्या आरोग्याशी खूप तडजोड करत आहेत. बऱ्याचदा तरुणांमध्ये इंफर्टिलिटीची समस्या दिसते. एनसीबीआयच्या सर्वेक्षणानुसार, सध्या वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी 40-50 टक्के प्रकरणे हे पुरुषांच्या शुक्राणूंची खराब गुणवत्ता आहे. वडील होण्यासाठी शुक्राणूंची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. चंदीगड येथील मिलन फर्टिलिटी सेंटरमध्ये डिपार्टमेंट ऑफ रिप्रोडक्टिव मेडिसीनच्या क्लिनिकल डायरेक्टर आणि सीनियर कन्स्लटंटन्ट डॉ. जसनीत कौर यांनी News18 शी बोलताना याबद्दल माहिती दिली आहे.

टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास महिलांनाही येतात अनेक समस्या, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

त्यांच्यानुसार, “आज बहुतेक लोकांसाठी चिंतेची गोष्ट ही आहे की शुक्राणूंची योग्य गुणवत्ता आणि गणना कशी राखता येईल, जेणेकरून पुरुष वडील बनण्यास सक्षम आहे.’’ त्यांनी सांगितले की शुक्राणू परिपक्व होण्यासाठी किमान तीन महिने लागतात. अशा परिस्थितीत आज जर तुम्ही निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला तर तीन महिन्यांनंतर तुमच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येईल आणि त्या वेळी तुमचे वडील होण्याची शक्यता प्रबळ असेल.

News18लोकमत
News18लोकमत

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे या जीवनशैलीशी संबंधित आहे. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे प्रत्येकाला आवडते. पण जर तुम्ही वडील बनण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ते टाळावे. युनिव्हर्सिटी ऑफ अर्कान्सास फॉर मेडिकल सायन्स (यूएएमएस) मधील युरोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ग्रॅहम ग्रीन म्हणतात, “गरम पाण्याचा तुमच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.” uamshealth.com या वेबसाईटनुसार, ज्या पुरुषांना वडील व्हायचे आहे त्यांनी गरम पाण्यापासून अंतर ठेवावे. तुम्ही अत्यंत गरम पाण्याच्या संपर्कात राहिल्यास, त्यानंतर तुमच्या शुक्राणूंची संख्या सामान्य होण्यासाठी किमान सहा महिने लागू शकतात. वडील होण्यासाठी पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या, त्याची हालचाल, आकार आणि रचना या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. uamshealth.com च्या मते, जर एखाद्या पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या 20 दशलक्ष प्रति मिलीलीटरपेक्षा जास्त हवी, 50 टक्क्यांहून अधिक शुक्राणू मूव्हिंग असावे आणि 30 टक्क्यांहून अधिकचा आकार आणि रचना सामान्य असेल, तर त्यांची वडील बनण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याचा प्रभाव गरम पाण्याचा शुक्राणूंवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरातील चयापचय क्रिया समजून घेणे आवश्यक आहे. पुरुषाच्या वृषणात शुक्राणूंची निर्मिती होते आणि जेव्हा अंडकोषांचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा चार अंश सेल्सिअस कमी असते तेव्हाच ते तयार होऊ शकते. आपल्या शरीराचे सामान्य तापमान ३६ अंश सेल्सिअस असते. शरीर सुडौल-फिट राखण्यासाठी रोजच्या आहारात फक्त इतका करा बदल जर तुमच्या अंडकोषांचे तापमान 30-32 डिग्री सेल्सिअस असेल तर शुक्राणूंची मात्रा आणि गुणवत्ता चांगली असते. अशा स्थितीत अंडकोषांजवळील शरीराच्या अवयवांचे तापमान सामान्य ठेवण्याची गरज असते. जर तुम्ही नियमितपणे गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर त्याचा थेट परिणाम शरीराच्या या भागावर होतो आणि हा भाग थोडासा गरम केला तरी त्याचा थेट परिणाम तुमच्या शुक्राणूंवर होतो. त्यामुळे डॉक्टर वंध्यत्वावर उपचार घेत असलेल्या लोकांना सैल कपडे घालण्याचा सल्ला देतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात