Home /News /lifestyle /

Obstructive Sleep Apnea मुळे बप्पी लहिरींना मृत्यूने गाठलं, नेमका काय आहे हा आजार?

Obstructive Sleep Apnea मुळे बप्पी लहिरींना मृत्यूने गाठलं, नेमका काय आहे हा आजार?

Obstructive Sleep Apnea: गेल्या वर्षीपासून बप्पी लहिरी यांना या व्याधीनं गाठलं होतं. काय आहे ही व्याधी आणि त्याचा व्यक्तीच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मुंबई, 16 फेब्रुवारी: भारतीय संगीतप्रेमींमध्ये डिस्कोची आवड निर्माण करणारा प्रयोगशील संगीतकार, गायक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri Demise) यांचं मंगळवारी (16 फेब्रुवारी 22) वयाच्या 69 व्या वर्षी मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात (Criticare Hospital) निधन झालं. गेल्या वर्षी त्यांना कोविड-19 आजारही (Covid-19) झाला होता, त्यातून ते बरेही झाले होते, मात्र त्यांना इतर अनेक व्याधींनी जखडले होते. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बप्पीदां यांच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरले ते म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (ओएसए-OSA), ही व्याधी. गेल्या वर्षीपासून त्यांना या व्याधीनं गाठलं होतं. काय आहे ही व्याधी आणि त्याचा व्यक्तीच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. झोपेशी संबंधित श्वासोच्छवासाचा विकाराला (Respiratory Problem) स्लीप अ‍ॅप्निया (Sleep Apnea) म्हणतात, त्याच्या तीन प्रकारांपैकी एक हा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (Obstructive Sleep Apnea) प्रकार आहे. सेंट्रल स्लीप अ‍ॅप्निया आणि कॉम्प्लेक्स स्लीप अ‍ॅप्निया असे याचे इतर दोन प्रकार आहेत. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियामध्ये व्यक्तीच्या घशाचे स्नायू शिथिल होतात आणि श्वासनलिकेत अडथळा निर्माण करतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या श्वासोच्छवास बंद होतो. हे वाचा-आधी लतादीदी आणि आता बप्पी दा.. 2 आठवड्यात 'मायलेका'च्या या जोडीचा जगाला निरोप याची लक्षणं काय आहेत? या विकाराच्या सर्वांत महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक ठळक आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे मोठ्यमोठ्या आवाजात घोरणं (Snoring). याशिवाय, दिवसा झोप लागणं, रात्री झोपेतून अचानक जाग येणं आणि त्यानंतर पुन्हा झोप लागताना श्वास लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं ही महत्त्वाची लक्षणं आहेत. सकाळी डोकेदुखी, तोंडाला कोरड पडणं, उच्च रक्तदाब, सतत मूड बदलणं आणि एकाग्रतेचा अभाव हीदेखील याची काही ठळक लक्षणं आहेत. एखाद्या व्यक्तीचं शरीर झोपेच्या REM म्हणजे गाढ झोपेच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे हा विकार उद्भवतो. हे वाचा-Bappi Lahiri एकमेव संगीतकार ज्यांना मायकल जॅक्सनने दिलं होतं आमंत्रण बप्पीदांना याच विकारानं गाठलं होतं. त्याशिवाय त्यांना इतरही अनेक व्याधी होत्या. आजारपणामुळे ते जवळपास 29 दिवस रुग्णालयात दाखल होते. 14 फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं त्यांना पुन्हा क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज पहाटे त्यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला.
First published:

Tags: Covid-19, Health, Health Tips, Lifestyle, Wellness

पुढील बातम्या