मुंबई, 26 ऑगस्ट : आपल्याकडे बेकिंग सोडा केवळ स्वयंपाकातच नाही तर अनेक आरोग्य समस्या सोडवण्यासाठीही वापरला जातो. एवढेच नाही तर बेकिंग सोडा त्वचेची चमक वाढण्यासही मदत करतो. परंतु तुम्हाला या बहुगुणी मानल्या जाणाऱ्या बेकिंग सोड्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? अतिप्रमाणात सोडा खाल्यास त्याचे अनके घातक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सोड्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगणार आहोत. योग्य प्रमाणातच करावे सेवन झी न्यूज हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, जर तुमचे पचन खराब असेल तर अर्धा कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि प्या. आठवड्यातून फक्त 2 वेळा याचे सेवन करा. अन्यथा याचे वाईट परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतात.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी चूर्ण-गोळ्या नको! ‘हा’ डाएट प्लॅन आहे पुरेसाअतिप्रमाणात बेकिंग सोडा खाण्याचे दुष्परिणाम - बेकिंग सोडा जास्त खाल्ल्याने तुमच्या पोटात गॅस होऊ शकतो, ज्यामुळे पोट फुगणे किंवा सूज येते. जेव्हा तुम्ही सोडा खाता तेव्हा तो रासायनिक प्रक्रियेत आम्लामध्ये मिसळतो. त्यामुळे बेकिंग सोडा मर्यादित प्रमाणातच घ्या. - विषबाधा व्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात बेकिंग सोडा खाल्ल्यानेदेखील पोट खराब होऊ शकते. जेव्हा बेकिंग सोडा अॅसिडमध्ये मिसळतो तेव्हा एक रासायनिक प्रक्रिया होते. जर एखाद्या व्यक्तीने एकाच वेळी जास्त प्रमाणात बेकिंग सोडा खाल्ले तर पोटात मोठ्या प्रमाणात गॅस जमा होऊ शकतो. त्यामुळे पोट फुटूही शकते. वर्क फ्रॉम होममुळे पॉर्न पाहण्याचं वाढलं व्यसन; वेळ वाचला मात्र मानसिक आरोग्य धोक्यात - बेकिंग सोडामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम असते, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. या पदार्थामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्याचा जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका किंवा हृदयक्रिया बंद पडू शकते. त्यामुळे याचे सेवन कमी करणे फार महत्वाचे आहे.