जेव्हा लघवीतून अधिक प्रमाणात प्रथिनं जाऊ लागतात आणि शरीरात प्रथिनांची कमतरता भासू लागते त्याला नेफ्रोटीक सिंड्रोम असं म्हणतात. हा किडनीचा आजार आहे. नेफ्रोटीक सिंड्रोम हा सगळ्यात जास्त लहान मुलांमध्ये आढळतो. मोठ्यांना पण हा आजार होऊ शकतो पण नेफ्रोटिक सिंड्रोम 2 वर्षे ते 6 वर्षे वयाच्या मुलांना जास्त होतो. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं, नेफ्रोटिक सिंड्रोममुळे पाय आणि टाचा सूजतात आणि इतरही समस्या उद्भवतात. नेफ्रोटिक सिंड्रोम काय आहे? शरीरात किडनी चाळणीचे काम करते. दूषित पदार्थांना वेगळे करते. पण या चाळणीचे म्हणजेच किडनीतील छिद्र मोठी झाली तर त्यातून शरीरासाठी आवश्यक पोषक अशी प्रथिनंही बाहेर पडू लागतात. ही प्रथिनं मूत्रामार्गे अधिक प्रमाणात जातात. त्याने शरीरात प्रथिनांची कमतरता भासू लागते. परिणामी डोळे आणि पोटात सूज येते सोबत कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यात किडनीतील लहान वाहिका ज्या गाळण्याचे काम करतात त्या खराब होतात. जर वेळीच योग्य उपचार केले नाही तर नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार दीर्घकाळ राहू शकतो. नेफ्रोटिक सिंड्रोम****ची लक्ष****णे नेफ्रोटिक सिंड्रोम झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या चहूबाजूने आणि पोटात सूज येते. यात उच्च रक्तदाबाची समस्या पण होऊ शकते. त्याशिवाय रुग्णाला भूक कमी लागते. जर अशी काही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांना भेटायला हवे आणि सांगायला हवे जेणेकरून वेळीच उपचार केले जाऊ शकतील. नेफ्रोटिक सिंड्रोमचं निदान करण्यासाठी या शारीरिक तपासण्या कराव्या लागतात लघवीची तपासणी जर नेफ्रोटिक सिंड्रोमचं कुठलंही लक्षण दिसत असेल तर लघवीतील प्रथिनांची तपासणी करावी. यात 24 तासांत लघवीची तपासणी करण्यास सांगितलं जातं. याने लघवीतील प्रथिनांचं प्रमाण बरोबर कळतं. रक्ताची तपासणी नेफ्रोटिक सिंड्रोम या आजाराच्या निदानासाठी रक्ताची तपासणी पण करतात. त्यात रक्तातील प्रथिनांची पातळी योग्य आहे की नाही ते तपासलं जातं. जर त्यात प्रथिनांची पातळी कमी असेल तर आणि त्यासोबत ट्राइग्लीसेराइडचे प्रमाण पाहिले तर नेफ्रोटिक सिंड्रोमचे योग्य निदान करणं शक्य होतं. बायोप्सी या तपासणीत किडनीच्या पेशीचा छोटा नमुना घेऊन डॉक्टर जी प्रक्रिया करतात त्याला किडनीची बायोप्सी म्हणतात. बायोप्सीमध्ये त्वचेतून किडनीमध्ये विशेष सुई टाकली जाते तिच्या सहाय्याने किडनीच्या पेशी घेतल्या जातात आणि मग त्यांना प्रयोगशाळेत पाठवले जाते. नेफ्रोटिक सिंड्रोम****पासून कसा बचाव कराल नेफ्रोटिक सिंड्रोमपासून बचाव करण्यासाठी प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की लक्षणं लवकर ओळखून उपचार करायला हवे. कारण त्या आजाराने भविष्यात अन्य समस्या निर्माण होऊ शकतात. हा आजार लहान मुलांना अधिक होण्याचे कारण अजून कळलेलं नाही. मुलांना चरबीयुक्त खाण्यापासून दूर ठेवलं पाहिजे, त्यांना योग्य प्रमाणात प्रथिनयुक्त आहार देत राहायला हवा. www.myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं, या आजारातील गुंतागुंत लक्षात घेता डॉक्टर औषधांसोबत आहारात बदल करायलादेखील सांगू शकतात. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - नेफ्रोटिक सिंड्रोम न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.