डेअरिंग लव्ह! कतरिनाच्या एका होकारासाठी त्याने खरंच दिली अग्निपरीक्षा; पाहा VIDEO

डेअरिंग लव्ह! कतरिनाच्या एका होकारासाठी त्याने खरंच दिली अग्निपरीक्षा; पाहा VIDEO

आधी स्वत:ला आग लावून घेतली आणि नंतर त्याने कतरिनाला प्रपोज केलं.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, असं विचारताच कोणताही तरुण 'तू फक्त बोल मी काय करू' असं त्या तरुणीला म्हणतो. तिच्या एका होकारासाठी तो काय काय नाही करत. ताजमहाल, आयफेल टॉवर किंवा सुंदर असं बीच अशा रोमँटिक ठिकाणी प्रपोज करतो. मात्र आता तुम्ही जो व्हिडीओ पाहणार आहेत, असं प्रपोज तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

एका स्टंटमनने गर्लफ्रेंडला प्रपोज करतानाही स्टंट केला आहे. आधी स्वत:ला आग लावून घेतली आणि नंतर त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. प्रेमात अग्निपरीक्षा द्यावी लागते असं म्हणतात, या स्टंटमनने मात्र प्रत्यक्षात तशी अग्निपरीक्षा दिली.  रिकी अॅश (Riky Ash) असं या स्टंटमनचं नाव आहे. 52 वर्षांचे रिकी यांनी कोरोना योद्धा कतरिना डॉबसनला असं प्रपोज केलं आहे. प्रपोजचा व्हिडीओ न्यूयॉर्क पोस्टने शेअर केला आहे.

आपल्यासाठी एखाद्या व्यक्तीने असा स्टंट केल्यावर साहजिक सुरुवातीला कुणाच्याही तोंडातून शब्द बाहेर पडणार नाही कारण असं पाहून आधी त्या व्यक्तीला शॉक बसेल. असाच धक्का रिकीने प्रपोज केल्यानंतर कतरिनाही बसला आणि इतकं केल्यावर कोणती गर्लफ्रेंड नाही म्हणेल. तिनंही रिकीला होकार दिला.

हे वाचा - धक्कादायक! चॅलेंज स्वीकारत तरुणाने चक्क गुप्तांगालाच लावली आग; LIVE VIDEO VIRAL

साऊथ वेस्ट न्यूज सर्व्हिसच्या (SWNS) रिपोर्टनुसार कतरिना डॉबसन नर्स आहे. रिकी आणि कतरिना दोघांचीही ऑनलाइन भेट झाली होती. भेटल्यानंतर रिकीने तिला लग्नासाठी मागणी तली. त्याने आपल्या अंदाजात तिला प्रपोज केलं.

Published by: Priya Lad
First published: August 12, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading