मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय, कधी आणि कसं खावं; हेल्दी राहण्यासाठी आहाराच्या टीप्स

काय, कधी आणि कसं खावं; हेल्दी राहण्यासाठी आहाराच्या टीप्स

आयुर्वेदात आहाराबाबत काही नियम आहेत ज्याचं पालन केल्यास आपण स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकतो.

आयुर्वेदात आहाराबाबत काही नियम आहेत ज्याचं पालन केल्यास आपण स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकतो.

आयुर्वेदात आहाराबाबत काही नियम आहेत ज्याचं पालन केल्यास आपण स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकतो.

  • myupchar
  • Last Updated :
आहारासंबंधी चुकीच्या आणि वाईट सवयींचा आरोग्यावर दुष्परिमाम होतो. आयुर्वेदानुसार खाण्यापिण्याच्या नियमित वेळा आहेत. कधी, काय आणि कसं खावं याबद्दलचे काही नियम असतात. ज्यांचं पालन केल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येतं. आयुर्वेदानुसार अन्नामध्ये सहा स्वादांचा समावेश असावा. यात गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे समाविष्ट आहेत. हा एक संतुलित आहार मानला जातो आणि तो तसाच घ्यायला हवा. myupchar.com चे लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं की, भूक लागल्यावरच खा. शरीराला भूक न लागल्यास अन्न सेवन करू नये. भूक लागेल तेव्हा ती मारू नका. भूक लागलेली असताना खाल्ल्यावर जठरासंबंधी रस आणि पाचक एन्झाईमच्या स्रावास मदत होते. अन्नाचं पचन खूप आवश्यक बाब आहे. जर अन्न पचलं नाही आणि दुसरं काही खाल्लं, तर अनेक समस्या निर्माण होतात. चुकीचं अन्न खाल्लं तर अन्न पचवण्यात अडचण येते. यामुळे अपचन होते. एका नियमित अंतराने अन्न ग्रहण केलं पाहिजे हेदेखील लक्षात ठेवा. निर्धारित वेळेस शरीर पाचन एन्जाइम सोडण्यात मदत करतं आणि पचन सुलभ करतं. काही लोकांना अन्न घाईघाईत खायची सवय असते. मोबाइल, टीव्ही पाहताना किंवा बोलताना अन्न खाल्लं तर त्याचा देखील अन्नाच्या प्रमाणात परिणाम होतो. तेलकट पदार्थांचं सेवन केलं असेल तर पचनाच अडथळा निर्माण होईल. पाचक शक्तीच्या क्षमतेच्या केवळ अर्ध्या क्षमतेचं अन्न सेवन करा. हलके अन्न पदार्थ खाल्ले जाऊ शकतात. हे वाचा- काय सांगता! झुरळांपासून अनेक प्राणी खाणाऱ्या चिनी लोकांना दूध पचत नाही, कारण... आयुर्वेदानुसार जेवण करण्यापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आपण जेवणादरम्यान एक-एक घोट घेऊ शकता पण पाणी गरम असलं पाहिजे. जेवण होण्यापूर्वी कोल्ड कॉफी, आईस टी यासारखे थंड पाणी किंवा पेये पचन शक्ती असंतुलित करतात. गरम किंवा साधं पाणी प्या. भूक लागल्यास पाणी पिऊन पोट शांत कधीही करू नये किंवा तहान लागलेली असता जेवण ग्रहण करू नये. योग्य खाल्ल्याने पचन योग्य राहिल, अन्यथा पचनतंत्राच्या आजाराची शक्यता वाढेल. हे वाचा- आई व्हायचंय! वयाच्या कोणत्या टप्प्यावर हा निर्णय घेणं योग्य? myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, पचनप्रणाली शरीरातील आवश्यक पोषकद्रव्यं शोषण्यास मदत करते आणि विषारी घटक बाहेर फेकते. पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी आहारात बदल करणं आवश्यक आहे. जर पचनप्रणालीचे आजार असतील तर चरबी आणि तळलेले पदार्थ, चिकट पदार्थ, मसालेदार पदार्थ टाळले पाहिजेत. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख आरोग्यदायी आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Ayurved, Food, Health, Lifestyle

पुढील बातम्या