जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आई व्हायचंय! वयाच्या कोणत्या टप्प्यावर हा निर्णय घेणं योग्य?

आई व्हायचंय! वयाच्या कोणत्या टप्प्यावर हा निर्णय घेणं योग्य?

आई व्हायचंय! वयाच्या कोणत्या टप्प्यावर हा निर्णय घेणं योग्य?

योग्य वयात गरोदरपण हे आई आणि बाळ दोघांसाठी महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    पूर्वी मुली आपल्या करिअरबद्दल, स्वप्नांविषयी आणि ध्येयांबाबत जास्त विचार करत नव्हत्या. पण आता प्रत्येक मुलगी तिच्या पायावर उभे राहाण्याचा, स्वतःचा एक ठसा उमटवण्याचा आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे लग्न उशिरा आणि मग मुलंही उशिरा. त्याचा परिणाम आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे योग्य वयात गरोदरपण हे आई आणि बाळ दोघांसाठी महत्त्वाचं आहे. पण आता प्रश्न पडतो की आई होण्यासाठी योग्य वय कोणतं? myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, गर्भधारणेसाठी योग्य वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. विशीतील गरोरदपण चांगलं आहे. गर्भधारणेसाठी 25 ते 30 वय सर्वोत्कृष्ट आहे कारण यावेळी प्रजनन प्रणाली आणि शरीरातील इतर प्रणाली चांगल्या कार्यरत असतात. 30 वर्षानंतर महिलांमध्ये अनेक संप्रेरक बदल होतात. या वयानंतर त्यांची पुनरुत्पादक पातळी कमी होते आणि शरीरात बीज उत्पादन कमी होतं, ज्यामुळे वंध्यत्वाचा धोका वाढतो. वय 35 वर्षांपेक्षा जास्त असल्यास गर्भधारणा राखणं आणि निरोगी बाळाचा जन्म होण्याची शक्यता कमी होत जाते. एका अभ्यासानुसार 35 ते 40 वयोगटात गर्भधारणेची शक्यता 20 ते 25 वर्षे वयोगटातील महिलांच्या तुलनेत 50 टक्क्यांनी कमी होते. त्याच वेळीव यामुळे गर्भधारणेदरम्यान मधुमेहाची तक्रार येऊ शकते. तसंच वाढलेल्या वयामुळे गर्भधारणेदरम्यान वजन वाढल्यास रक्तदाब वाढू शकतो. स्त्रियांमध्ये अत्याधिक लठ्ठपणा किंवा जास्त वजन देखील गर्भधारणेच्या समस्येस कारणीभूत ठरू शकतं. वयाच्या 35 व्या वर्षानंतर मुलात न्यूरल ट्यूब दोष किंवा डाऊन सिंड्रोमसारखी स्थिती उद्भवू शकते. हे वाचा -  Breast मध्ये गाठ जाणवतेय का? कॅन्सरसारख्या गंभीर आजारांसह 5 समस्येची लक्षणं असं असलं तरी 30 वर्षानंतर मातृत्व सुख उपभोगता येत नाही असं नाही पण या वयानंतर गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. इतकंच नाही तर वेळेआधीच प्रसूतीदेखील होऊ शकते. या वयानंतर जर मुलाची योजना आखत असाल तर महिलेला शारीरिक परिस्थितीबद्दल नियमित तपासणी करणं आवश्यक आहे. myupchar चे डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं, नियमित अल्ट्रासाऊंड केल्यामुळे जन्मलेल्या मुलाच्या विकासावर नजर ठेवता येते. अल्ट्रासाऊंड हे जन्म दोषांसारख्या समस्या शोधण्यासाठी उपयपक्त ठरतं. हे वाचा -  फक्त दूधच नाही तर हळदीचं कोमट पाणीही उत्तम; डायबेटिज रुग्णांनी तर नियमित प्यावं गर्भधारणा सुमारे चाळीस आठवड्यांचा कालावधी असतो ज्या दरम्यान महिलेच्या गर्भाशयात गर्भ विकसित होतो. एकदा गर्भधारणेची पुष्टी झाल्यावर गर्भधारणा, नाळेसंबंधी गर्भपात इत्यादी कोणत्याही गुंतागुंत किंवा धोका टाळण्यासाठी योग्य (जन्मापूर्वी) काळजी घ्यावी. आई आणि मुलाचे आरोग्य जाणून घेणं हा त्याचा एक मुख्य हेतू आहे. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गर्भधारणा न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात