मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हे पदार्थ उपवास करताना टाळाच; हमखास वाढेल अ‍ॅसिडिटी आणि पोटाचे विकार

हे पदार्थ उपवास करताना टाळाच; हमखास वाढेल अ‍ॅसिडिटी आणि पोटाचे विकार

Ganesh Chaturthi 2021 – हरितालिकेला उपवास करताना डायबेटिजच्या रुग्णांनी जास्त काळजी घ्यावी. रिकामं पोट ठेवणं योग्य नाही आणि उपवास सोडताना काय खावं हेसुद्धा महत्त्वाचं ठरतं

Ganesh Chaturthi 2021 – हरितालिकेला उपवास करताना डायबेटिजच्या रुग्णांनी जास्त काळजी घ्यावी. रिकामं पोट ठेवणं योग्य नाही आणि उपवास सोडताना काय खावं हेसुद्धा महत्त्वाचं ठरतं

Ganesh Chaturthi 2021 – हरितालिकेला उपवास करताना डायबेटिजच्या रुग्णांनी जास्त काळजी घ्यावी. रिकामं पोट ठेवणं योग्य नाही आणि उपवास सोडताना काय खावं हेसुद्धा महत्त्वाचं ठरतं

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 2 सप्टेंबर : आधी श्रावण आणि मग गणपती-गौरी या काळात उपासाचे भरपूर पदार्थ खाल्ले जातात. श्रावणी सोमवार, शुक्रवार आणि भाद्रपदात गणपती आधी येणारी हरितालिका या दिवशी अनेक जणी कडक उपवास करतात. देवासाठी श्रद्धेने आपण उपवास करतोच पण, सलग उपवास केल्याने आपल्याला अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.

हरतालिका, गणेश चतुर्थी आणि ऋषीपंचमी या दिवशी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाण्यात आले तर, त्रास होऊ शकतो. उपवास काळात पौष्टिक आणि पोटाला न बाधणारे पदार्थ खावेत.

खूप जण उपवास म्हणजे पूर्ण दिवसभर उपाशी राहतात पण, त्यानेच जास्त त्रास होतो. शिवाय गणपती म्हणजे घरात लगबग असतेच. अशा वेळेस उपवासाला चालणार पण, हलके पदार्थ खावेत.

वेफर्स, साबुदाणा वेड, उपवासाचे पापड असे तळलेले पदार्थ, केळी, शेंगदाणे, खाणं पोटासाठी चांगलं नसतं. पण, आपल्याकडे उपसाला हे पदार्थ खाणं प्रचलित आहे. पण, उपवास योग्य पद्धतीने केले तर, तो आरोग्यदायी ठरतो नाहीतर, दुसऱ्या दिवशीही आपल्याला त्रास होत राहतो.

उपवासाच्या आदल्याच दिवशी हलका आहार घ्यावा. जड पदार्थ खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. पोट साफ  न झाल्याने पवासाच्या दिवशीही गॅस, छातीत जळजळ वाढू शकते.

(गणेश चतुर्थीचं हे महत्त्व माहीत आहे का? प्रतिष्ठापना का, कशी आणि कधी करावी?)

साबुदाणावड किंवा खिचडी, बटाट्याचे तळलेले काप असे पदार्थ पोट भरीचे असले तरी ते टाळून, वाफवलेले पादर्थ म्हणजे रताळी, बाटाट्याची खिचडी खावी. राजगिरा, शिंगाडा याची भाजणी उपवासाला चालते. आता बाजारात  काकडी, दोडकं आणि वेगवेगळ्या प्रकारची फळही भरपूर आलेली असतात. उपवासाच्या वेळी होणारा पित्ताच त्रास टाळायचा असेल तर, दही, मठ्ठा, लस्सी सुद्धा पित रहावा. लिंबू पाणीही चालू शकतं पण, काहीजणांना लिंबू पाण्यामुळे अ‍ॅसिडिटी होते.

(कोरोनावर मात केल्यानंतर ठणठणीत राहण्यासाठी फॉलो करा 'हा' डाएट)

खूप भूक लागेपर्यंत उपाशी राहू नये. उलट थोड्याथोड्या वेळाने काहीतरी खात रहावं. म्हणजे ताकद राहते. सुकमेवाही खाऊ शकता. मिल्क शेक, ज्युस पित रहावेत.

डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी उपवासात जास्त काळजी घ्यावी. जास्त वेळ उपाशी राहिल्याने शुगर वाढू शकते किंवा अंग थरथरण्याचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे फळं, ड्रायफ्रुट, भाजलेले मखाणे खावेत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवास काळाच पाणी पित रहावं म्हणजे शरीर हायड्रेट राहील.

(Ganesh Chaturthi 2021: गणपतीची तयारी करण्याअगोदर हे नियम वाचा)

दिवसभर उपाशी राहिल्यावर काही लोक रात्री भरपूर जेवण करतात जे चूकीचं आहे. उलट उपवास सोडताना हलकं जेवण घ्यावं. म्हणजे मुगाची खिचडी, थालीपिठ, तुरीच्या वरणाऐवजी मुगाचं वरण खावं. चुकूनही, पापड, भजी, लोणचं उपवास सोडताना खाऊ नयेत.

First published:

Tags: Culture and tradition, Food, Ganesh chaturthi