गणेशोत्सवाची तयारी सुरू केली असेल, पण Covid-19 चा धोका अद्याप टळलेला नाही आणि यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाच्या निर्बंधांमध्येच साजरा करावा लागणार आहे.
घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने नियम घालून दिले आहेत. ते जाणून घेण्यासाठी स्क्रोल करा..
गणेशोत्सव काळात कुठल्याही मंडपात गर्दी होता कामा नये. नाहीतर कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.
सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट राहणार आहे. त्यापेक्षा मोठ्या मूर्तीला परवानगी नाही.
ही अशी गर्दी या वर्षी परवडणारी नाही. गर्दी होईल असे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
आरतीसारख्या कार्यक्रमांच्या वेळी भक्तांची गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाइन दर्शन ठेवावं, असं मोठ्या मंडळांना आवाहन करण्यात आलं आहे.
भक्तांना, कार्यकर्त्यांना विसर्जन स्थळी गर्दी करता येणार नाही. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या हाती द्यावी लागेल. महापालिकेने नेमलेले कर्मचारी विसर्जन करतील.
कोरोनाव्हायरच्या तिसऱ्या लाटेच्या संकेतामुळे यावर्षीसुद्धा गणेशोत्सावावर साथीचं सावट आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबईसह बहुतेक शहरांच्या प्रशासनांनी हे नियम घातले आहेत.