नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: हॅाटेलमध्ये गेल्यावर अनेकदा तुम्ही आवडीने तंदुरी रोटी (tandoori roti) खात असाल. शेवभाजी असो, पनीर असो किंवा चिकन (chicken) हे पदार्थ खाण्याची मज्जा ही तंदुरी रोटीसोबतच येते. पण ही रोटी मैद्यापासून बनवली जाते. मैद्यापासून बनवलेल्या पदार्थ्यांचे वारंवार सेवन केल्यास अनेक रोग होतात. तसेच तंदूरी रोटी पारंपारिकपणे तंदूरमध्ये शिजवल्या जातात आणि कोळशाचा वास देखील त्यांना येतो. सण असोत किंवा विवाह सोहळे, तंदूरमध्ये शिजवलेल्या रोटी सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि कोणीही त्यांना नाही म्हणू शकत नाही. कारण भाजी कोणतीही असू द्या, तंदुरी रोटीसोबत ती खाण्याची मज्जा वेगळीच असते. पण तंदुरी रोटी ही जितकी चवीला छान लागते, तेवढी आरोग्यासाठी चांगली नाही. तंदुरी रोट्या मैद्यापासून तयार केल्या जातात. पॉलिश केलेल्या गव्हावर प्रक्रिया करून मैदा तयार केला जातो. एवढंच नाही तर हा मैदा बेंझॉयल पेरोक्साईडने ब्लीच करण्यात येतो. जे पीठाला पांढरा रंग आणि चिकटपणा देतं. केमिकल मिसळल्यामुळे हे मैद्याचं पीठ आपल्या आरोग्यासाठी हानीकारक होतं. मैद्याचं वारंवार सेवन केल्यास आयबीएस (IBS), तीव्र बद्धकोष्ठता, पचनासंबंधी समस्या, ट्रायग्लिसेराइड्स, कोलेस्टेरॉल इत्यादी अनेक घटकांचा शरीरात साठा होण्यासोबतच अनेक आजारांचा धोका संभवतो. एका तंदुरी रोटीमध्ये सुमारे 110 ते 150 कॅलरी (calories) असतात. त्यापैकी कार्बोहायड्रेटमध्ये आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असतं. शिवाय, तंदुरी रोटीमध्ये प्रोटीनदेखील असतं, परंतु जास्त नाही. एक तंदुरी रोटी दिवसाला आवश्यकता असलेल्या कॅलरीच्या (2000 कॅलरी) 6 टक्के कॅलरी प्रदान करते. हे वाचा- सणासुदीत बिनधास्त खा! Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त फॉलो करा या टीप्स तंदूरी रोटी पारंपरिकपणे तंदूरमध्ये शिजवल्या जातात आणि त्याला कोळशाचा वास येतो. पण ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील (oxford university) झालेल्या संशोधनानुसार (research) प्रोफेसर झेंगमिंग चेन म्हणाले की, ‘कोळसा, लाकूड किंवा कोळशासारख्या घन इंधनांमध्ये बराच काळ शिजवलेलं अन्न खाण्यानं केवळ वायू प्रदूषणच होत नाही तर हृदयविकाराचा धोकाही वाढतो.’ मैदा पीठ हे सर्वात प्रथम आपल्या शरीरातील साखरेची पातळी (sugar level) वाढवतं. कारण त्यात ग्लाइसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. साखरेचं पचन होण्यासाठी शरीरात इन्शुलिन स्रवणं गरजेचं असतं. जर आपण वारंवार मैद्याचे पदार्थ खात असाल तर हळूहळू इन्शुलिनचं उत्पादन कमी होत जातं, ज्यामुळे मधुमेहाचा (Diabetis) धोका होऊ शकतो. हे वाचा- कोरोनावर मात केल्यानंतर ठणठणीत राहण्यासाठी फॉलो करा ‘हा’ डाएट जर तुम्हाला तंदुरी रोटी खाण्याची खूप आवड असेल तर रोटी बनवण्यासाठी मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरा. तसेच आपण रोटी बनवण्यासाठी अर्धा मैदा पीठ आणि अर्धा गव्हाचे पीठ देखील वापरू शकता. रोटी बनवण्यासाठी ओव्हनचा वापर करावा. रेस्टॉरंट्स असो वा विवाह सोहळा, तेथे गेल्यानंतर तंदुरी रोटी खाण्याचा मोह होणे साहजिकच आहे. पण ही रोटी आपल्या आरोग्यासाठी घातक होऊ शकते, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे तंदुरी रोटी खाण्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.