कॅनबेरा, 17 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये अनेकांना डिप्रेशन आलं आहे. मात्र फक्त माणसंच नव्हे तर माशांनाही या समस्येचा सामना करावा लागतो आहे. लॉकडाऊनमध्ये जसं तुमच्यापासून दूर असलेल्या जवळच्या व्यक्ती, मित्रमैत्रिणींची आठवण तुम्हाला येते आहे, तशी या माशांनाही त्यांच्याभोवती नेहमी असणाऱ्या माणसांची आठवण येते आहे. अशी अवस्था झाली आहे ती ऑस्ट्रेलियाच्या मत्सालयातील माशांची. ऑस्ट्रेलियातील (Australia) प्रसिद्ध मत्यालय (Aquarium) मार्चपासून बंद आहे. माणसं नसल्यानं अनेक मासे निरुत्साही झालेत. त्यापैकी काही तर टँकच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपून बसलेत. तज्ज्ञांच्या मते, माशांमध्ये ही डिप्रेशनची लक्षणं दिसून आलीत. हे वाचा - Breaking कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन तज्ज्ञांच्या मते, हे प्राणी टँकबाहेर पाहू शकत होते, माणसांना पाहत होते आणि अचानक माणसं दिसत नाही, त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होतो आहे. माणसांमध्ये या माशांमध्येही सेरोटोनिन आणि डोपामाइनमध्ये बदल दिसून आलेत. ज्यामुळे या माशांना डिप्रेशन आलं आहे. मत्यालय व्यवस्थापकांनी आता या मत्सालयात एक पाणबुड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे; जेणेकरून ते माशांसोबत पोहोतील, त्यांना कंपनी देतील. हे वाचा - ‘या’ देशात नागरिकांना दररोज 90 किलो मलत्याग करण्याचे आदेश याआधी जपानच्या प्राणीसंग्रहायलयातही माणसं येत नसल्यानं प्राण्यांमध्ये स्ट्रेस दिसून आला होता. तिथले प्राणी विचित्र वागू लागले होते. त्यानंतर प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनानं या प्राण्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून भेट करून दिली. यासाठी तीन दिवसांचं face-showing fetsival आयोजित करण्यात आलं होतं. संकलन, संपादन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.