मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /राशीभविष्य: धनु आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना कामात अडथळे निर्माण होऊ शकतात

राशीभविष्य: धनु आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना कामात अडथळे निर्माण होऊ शकतात

कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मुंबई, 19 जून : प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या रोजच्या दिवसावर होत असतो. दिवसभरात येणाऱ्या समस्या कोणत्या याची पूर्णकल्पना असेल तर त्यांचा सामना करणं अधिक सोयीचं जातं यासाठीच जाणून घ्या 19 जूनचा दिवस आपल्यासाठी कसा असेल.

मेष - आजचा दिवस आपल्यासाठी फायदेशीर नाही. नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्यावर पडू देऊ नका.

वृषभ- आरोग्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.

मिथुन- चांगल्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागा. दीर्घ काळासाठी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल. ऑफिसमध्ये आपल्या कामात अडथळा आणणारे बरेच लोक असतील.

कर्क- कोणताही निर्णय घेण्याआधी ज्येष्ठ किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. व्यक्तीमत्त्व सुधारण्यावर लक्ष द्या.

हे वाचा-ही आहेत DEPRESSION ची प्रमुख 2 लक्षणं; ती दिसली तर व्यक्तीशी कसं बोलायचं?

सिंह - काही घटनांमुळे अचानक समस्यांचा सामना करावा लागेल. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील. पार्टनरच्या प्रेमात अखंड बुडाल.

कन्या- आरोग्य चांगलं राहिल. कोणताही प्रश्न शांत डोक्यानं सोडवण्याचा प्रयत्न करा. नवीन योजना चांगल्या उत्पन्नाचे साधन ठरतील.

तुळ- कामातून लवकर मोकळं होण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करताना माहिती घेणं महत्त्वाचं आहे. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही अधिक चांगला प्रयत्न करत राहाल.

वृश्चिक- आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला नाही. आरोग्य आणि गुंतवणूक दोन्हीमध्ये सावधगिरी बाळगायला हवी. आयत्यावेळी योजनेत बदल करावा लागेल.

धनु- हुशारीनं काम केलं तर नक्कीच यश आपलं आहे. वादविवाद आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरतील. कामासाठी आजचा दिवस शुभ आहे.

मकर- भावनांवर नियंत्रण ठेवा. खर्च आवाक्याबाहेर होणार नाही याची काळजी घ्या. छोट्या गोष्टींवरून वाद वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ- भावनांवर नियंत्रण ठेवा आजचा दिवस समिश्र आहे. कुणीही गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या.

मीन- कुटुंबीयांच्या वागण्यामुळे मनस्ताप होईल. बचतीऐवजी खर्च वाढतील. आपण कठोर परिश्रम आणि सहनशक्तीच्या बळावर आपले उद्दीष्ट साध्य करू शकता.

हे वाचा-21 जूनला भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण; पुन्हा कित्येक वर्ष येणार नाही असा योग

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Astrology and horoscope