• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Alert! कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच Drug resistant Fungus चा शिरकाव; दोघांचा मृत्यू

Alert! कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच Drug resistant Fungus चा शिरकाव; दोघांचा मृत्यू

भारतात अॅस्परजिलस लेंटुलसचे (Aspergillus lentulus) फंगसचं पहिलंच प्रकरण आढळलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : देशावर कोरोनाचं (Corona) सावट अद्याप कायम आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी हे संकट अद्याप पूर्णपणे गेलेलं नाही. देशात कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात असतानाच एका नव्या बुरशीजन्य आजाराने शिरकाव केला आहे (Fungal Disease). भारतात पहिल्यांदाच अॅस्परजिलस लेंटुलसचे (Aspergillus lentulus) प्रकरण आढळून आलं. या आजारामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अॅस्परजिलस लेंटुलसचा (Aspergillus lentulus) पहिला रुग्ण 2005 मध्ये आढळून आला होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजीनं दिली आहे. अॅस्परजिलस लेंटुलसचा पहिला रुग्ण 2005 साली आढळून आला. स्टेम सेल ट्रान्सप्लांट (Stem Cell Transplant) झालेल्या रुग्णाच्या शरीरात ही बुरशी पहिल्यांदा आढळून आली. भारतात नुकताच या विकाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) अॅस्परजिलस लेंटुलस बुरशीचा नवा स्ट्रेन (Strain) आढळून आला असून, या स्ट्रेनवर सध्या तरी कोणतंही औषध उपयोगी ठरत नसल्याचं दिसून आलं आहे. या बुरशीच्या संसर्गामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ज्या दोन रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला, त्यापैकी एकाचं वय 40, तर दुसऱ्या रुग्णाचं वय 50 वर्षं होतं. हे वाचा - धक्कादायक! स्वत: पालकच आपल्या मुलांना पाठवत आहेत कोरोना पार्टीत कारण... एका अहवालानुसार, अॅस्परजिलस लेंटुलसचा संसर्ग झालेल्या एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, संसर्ग आटोक्यात येत नसल्यानं त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे एक महिना अँटीफंगल (Antifungal) औषधं देऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले; मात्र प्रकृती न सुधारल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या रुग्णाला तीव्र स्वरूपाचा ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एम्समधल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर एक आठवडा उपचार करण्यात आले. परंतु, मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे (Multi Organ Failure) त्याचा मृत्यू झाला. मेडिकल जर्नलच्या म्हणण्यानुसार, अॅस्परजिलस लेंटुलसच्या संसर्गामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो. ही बुरशी कोरोनाप्रमाणे फुफ्फुसं (Lungs) निकामी करते.  हा विकार इतका गंभीर आहे, की यावर सर्व औषधं (Medicine) निष्प्रभ ठरत आहेत.  यावर कोणतंही औषध प्रभावी ठरत नसल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. हे वाचा - जगभरात Corona वाढत असल्यानं मोदी सरकार चिंतेत; 13 राज्यांना पत्रातून इशारा ही बुरशी माती आणि सडलेल्या पदार्थांमध्ये आढळते. या बुरशीचे कण हवेच्या माध्यमातून संसर्ग पसरवतात. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, ज्यांना रक्ताचा कर्करोग झाला आहे किंवा ज्यांचं अवयव प्रत्यारोपण झालं आहे अशा व्यक्तींना हा संसर्ग प्रामुख्यानं होऊ शकतो. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांचा संसर्ग दिसून येत आहे. त्यामुळे दक्षता घेणं गरजेचं आहे. शरीरात कोणत्याही प्रकारचा बदल जाणवल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अॅस्परजिलस लेंटुलसचा संसर्ग झाल्यावर वेळेवर उपचार घेतले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते, असं तज्ज्ञांनी सांगितलं.
First published: