जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / धक्कादायक! स्वत: पालकच आपल्या मुलांना पाठवत आहेत कोरोना पार्टीत कारण...

धक्कादायक! स्वत: पालकच आपल्या मुलांना पाठवत आहेत कोरोना पार्टीत कारण...

धक्कादायक! स्वत: पालकच आपल्या मुलांना पाठवत आहेत कोरोना पार्टीत कारण...

पालक मुद्दामहून आपल्या मुलांना कोरोना संक्रमित होण्यास प्रोत्साहन देत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

ऑस्ट्रिया, 24 नोव्हेंबर :  आपल्याला कोरोना (Coronavirus) होऊ नये याची काळजी प्रत्येक जण घेत आहे. पालकही आपल्या मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल आई-बाबाच आपल्या मुलांना कोरोनासमोर ढकलत आहे. ऑस्ट्रियामध्ये कोरोनाव्हायरस पार्ट्या (Corona party) केल्या जात आहेत आणि या पार्ट्यांमध्ये पालक आपल्या मुलांना मुद्दामहून पाठवत आहेत. कोरोनाव्हायरस पार्टी म्हणजे ज्या पार्टीत कोरोना संक्रमित व्यक्ती येतात आणि त्यानंतर स्वतःहून संक्रमित होण्यासाठी निरोगी व्यक्तीसुद्धा या पार्टीत येतात. धक्कादायक म्हणजे या पार्ट्यांमध्ये पालक आपल्या मुलांनाही पाठवतात एशिया न्यूज नेट ने डोलोमिटीच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर इटलीच्या दक्षिण टायरॉलमधील बोलजानो शहरात अशीच एक कोरोना पार्टी झाली होती. ज्यामध्ये सहभागी झालेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अशाच आणखी एका पार्टीत तीन आणखी लोक संक्रमित झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही पालकही आपल्या मुलांना या कोरोना पार्टीत घेऊन गेले होते. हे वाचा -  महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट, आरोग्यमंत्र्यांचा इशारा बहुतेक युरोपियन देशात ग्रीन पास सुरू करण्यात आला आहे. इटलीमध्ये 2021 मध्ये ग्रीन पास सिस्टम लागू करण्यात आली. यानुसार खासगी किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाजवळ ग्रीन पास असणं बंधनकारक आहे. ग्रीन पास नसेल तर कामावर घेतलं जात नाही. ऑस्ट्रियातही असाच कायदा लागू करण्यात आला आहे. ग्रीन पाससाठी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत किंवा ती व्यक्ती सहा महिन्यांपूर्वी कोरोना संक्रमित होऊन बरी झालेली असावी. म्हणजे तुमच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या असाव्यात. त्यामुळे लोक मुद्दामहून कोरोना संक्रमित होत आहे. अशात कोरोना पार्ट्यांमध्ये जात आहेत. हे वाचा -  Corona Alert: मास्क काढण्याची घाई नको! लसवंतांनाही Delta variant चा धोका कायम डॉ. फ्रान्जोनी यांनी सांगितलं की सध्या मुद्दामहून कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. लशीशिवाय अँटिबॉडी मिळवून ग्रीन पास मिळवण्यासाठी ते असं करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात