Home /News /coronavirus-latest-news /

जगभरात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं मोदी सरकार चिंतेत; 13 राज्यांना पत्र लिहून दिल्या या सूचना

जगभरात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं मोदी सरकार चिंतेत; 13 राज्यांना पत्र लिहून दिल्या या सूचना

अलीकडच्या काळात अनेक देशांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि काही विकसित देशांना कोविड-19 विरुद्ध लसीकरणाची उच्च पातळी असूनही चौथ्या आणि पाचव्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (union health ministry) पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्र, पंजाबसह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून साप्ताहिक चाचणी दर कमी असणे आणि काही जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाम वाढल्यानं चिंता व्यक्त केली आहे. नागालँड, सिक्कीम, महाराष्ट्र, केरळ, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि लडाख या राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्र लिहलं आहे. लग्नांचा हंगाम, सण आणि उत्सवांमुळे अलीकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याप्रमाणात चाचण्यांचा दरही उच्च राखण्यावर भर देण्यास सांगण्यात आलं आहे. भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, चाचणीअभावी समाजातात संसर्गाचे प्रमाण किती आहे हे, कळणार नाही. त्यांनी अधोरेखित केलं की, हिवाळा सुरू झाल्यानं आणि काही राज्यांमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे तीव्र श्वसनाचे आजार असलेल्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. संसर्गाचे मोठे क्षेत्र ओळखण्यासाठी वेळेवर पावले उचलली पाहिजेत. पुरेशा चाचणीअभावी एखाद्या भागात संसर्ग किती प्रमाणात पसरला हे निश्चित करणे फार कठीण आहे. हे वाचा - White Honey: तुम्ही कधी पांढरा मध खाल्लाय का? त्याचे आरोग्यासाठी इतके सारे आहेत फायदे "अलीकडच्या काळात अनेक देशांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि काही विकसित देशांना कोविड-19 विरुद्ध लसीकरणाची उच्च पातळी असूनही चौथ्या आणि पाचव्या लाटेचा सामना करावा लागत आहे," असे पत्रात म्हटले आहे. या आजाराचा धोका आणि संसर्गाचे स्वरूप लक्षात घेता, सतत दक्ष राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हे वाचा - ‘लस नाही तर दारू नाही’; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मद्यप्रेमींना झटका आत्तापर्यंत महत प्रयत्नांनी सुधारलेली कोरोना स्थिती आपल्याला कायम ठेवायची आहे. त्यासाठी कोणतीही ढिलाई न करता सर्व प्रशासनानं सतर्क राहण्याची गरज आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सर्व राज्यांना दिलेल्या सूचना एक समान आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या