मुंबई, 09 ऑगस्ट : प्रेम हे विश्वासावर आणि संवादावर टिकून असते. या दोन्ही गोष्टी जिथे संपतात तिथे नांत देखील संपू शकते. रिलेशनशिपमध्ये जोडीदाराने तुमच्या प्रत्येक गोष्टीशी एकरूप व्हावे आणि प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी अशी तुमची इच्छा असते. परंतु हे तेव्हाच घडू शकते जेव्हा जोडीदाराला तुम्ही त्याच्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमीच त्यांच्यासोबत आहात आणि तुमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे असे त्याला वाटेल. त्यामुळे जोडीदाराच्या मनातील तुमच्याविषयीचे प्रेम आणि विश्वास अधिक मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न करण्याची जबाबदारीही तुमचीच असते. नातं घट्ट करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्ता करतात. परंतु तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पारदर्शक असाल आणि मोकळेपणाने संवाद साधून नाते पुढे नेत असाल तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराशी संवाद साधताना तुम्ही त्याला नक्की कोणते प्रश्न विचारल्यास (Questions To Ask Your Partner) तुमचं नातं अधिक घट्ट होईल हे जाणून घेऊया. तुमच्या जोडीदाराला विचारा हे 6 प्रश्न 1) जोडीदाराच्या वाईट काळात त्यांना बरे वाटण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे विचारा. त्यांना बोलता बोलता विचारा की वाईट काळात त्यांचा मूड सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता? या प्रश्नामुळे तुम्हाला त्यांची काळजी आहे आणि तुम्ही त्यांना संकटांपासून वाचवू पाहता हे त्याच्या लक्षात येऊ शकते. यामुळे तुमचे प्रेम वाढेल. 2) जोडीदाराला हा प्रश्न नक्की विचारा की त्यांना सर्वात जास्त चांगले केव्हा वाटते? या प्रश्नाचे उत्तरामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराला मदत करणे सोपे होईल आणि तुमच्या जोडीदाराला याची जाणीव होईल की तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे.
ही फक्त मैत्री की प्रेम? समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून त्याच्या मनातलं कसं ओळखायचं?- आपल्या नात्यातील सर्वात आवडती गोष्ट कोणती हा प्रश्न तुमच्या जोडीदाराला नक्ककी विचारा. तुम्ही हा प्रश्न विचारलात तर त्यांना बरे वाटेल आणि त्यांनी दिलेल्या उत्तराच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदाराला अधिक चांगले समजून घेऊ शकाल. 4) आपल्या नात्यात काय सुधारणा करणे आवश्यक आहे हा प्रश्न तुम्ही जोडीदाराला विश्वासात घेऊन विचारा.या प्रश्नामुळे तुमच्या पार्टनरला तुम्ही त्यांच्यासोबतच्या नात्यासाठी किती गंभीर आहात याची जाणीव होईल आणि तुमचं नात घट्ट होईल. 5) जोडीदाराला विचारा की तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता किंवा तुम्ही त्यांना अधिक आधार वाटण्यासाठी मी काय करावे असे देखील विचारू शकता. यामुळे जोडीदाराला तुमची त्यांच्याविषयीची काळजी दिसेल. 6)जोडीदाराशी बोलताना हा प्रश्न नक्की विचारा की सोबत एकत्र राहताना त्यांना सर्वात जास्त काय आवडते. म्हणजेच तुम्ही एकत्र असताना त्यांना काय करायला आवडते. Happy Hormones : तिची एक झलक दिसली तरी मन उडू उडू का होतं? तुम्हालाही माहिती नसेल हे कारण हे प्रश्न तुमच्या नात्यातील कोणत्याही प्रकारची समस्या किंवा गैरसमज दूर करण्याचे काम करू शकतात. तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराची मदत करायची आहे आणि तुम्हाला मनापासून त्यांची काळजी वाटते याची जाणीव तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारून करून देऊ शकता.