जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ही फक्त मैत्री की प्रेम? समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून त्याच्या मनातलं कसं ओळखायचं?

ही फक्त मैत्री की प्रेम? समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून त्याच्या मनातलं कसं ओळखायचं?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

समोरची व्यक्ती तुमची फक्त चांगली मित्र आहे, की ती तुमच्यावर प्रेमही करत आहे, ही बाब काही गोष्टींवरून जाणून घेता येऊ शकते.

    मुंबई, 26 जुलै : प्रत्येक नातं (Relation) आपलं जीवन (Life) समृद्ध करत असतं. प्रत्येक नात्यातून आपल्याला अनेक गोष्टींची उकल होते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम (Love) आणि मैत्री (Friendship) या दोन गोष्टी खूप स्पेशल असतात. प्रेम आणि मैत्रीत एकमेकांविषयी आपलेपणा आणि समर्पण असतं. प्रेम आणि मैत्री या दोन्ही गोष्टींतला फरक समजणं काही वेळा मुश्किल असतं. मुला-मुलींच्या मैत्रीत अनेकदा असे प्रसंग येतात, की त्या वेळी त्यांना वाटतं, की आपल्या चांगल्या मित्रासाठी आपण स्पेशल आहोत, त्याला आपण आवडतोय. अशा वेळी हे प्रेम आहे की मैत्री, हे नेमकं समजणं काहीसं कठीण जातं. समोरची व्यक्ती तुमची फक्त चांगली मित्र आहे, की ती तुमच्यावर प्रेमही करत आहे, ही बाब काही गोष्टींवरून जाणून घेता येऊ शकते. मुला-मुलींमध्ये अनेकदा घट्ट मैत्री असते; पण काही प्रसंगांमध्ये ते भावनिक आणि मानसिकदृष्टया एकमेकांच्या अगदी जवळ येतात. अशा वेळी आपल्यात मैत्री आहे, की त्यापलीकडे असलेलं प्रेम हे नीट समजू शकत नाही. काही मुलं किंवा मुली आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त करू शकत नाहीत. अशा वेळी काही गोष्टींमधून हे प्रेम आहे की फक्त मैत्री हे जाणून घेता येऊ शकतं. नव्यानं मैत्री झाल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्या खासगी आयुष्यात (Personal Life) विशेष रस घेत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही आवडत आहात, असा संकेत असतो. विशेषतः मुला-मुलींमध्ये नव्यानं मैत्री झाली तर त्यांना एकमेकांच्या खासगी आयुष्याविषयी सर्व काही जाणून घ्यायचं असतं. अर्थात ही बाब सामान्य असू शकते. कारण ते तुमच्या जीवनात स्वतःसाठी योग्य स्पेस (Space) शोधत असतात. हे वाचा -  Happy Hormones : तिची एक झलक दिसली तरी मन उडू उडू का होतं? तुम्हालाही माहिती नसेल हे कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीला समोरच्या व्यक्तीनं होकार देणं हे मैत्रीत सरसकट पाहायला मिळत नाही. एखादा मित्र किंवा मैत्रीण असं करत असेल तर तिला किंवा त्याला तुम्ही आवडता, असा त्याचा अर्थ होतो. तुमचं लक्ष वेधण्यासाठी तो किंवा ती असं करत असते. बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असू तेव्हा त्याची प्रत्येक गोष्ट मनात नसलं तरी बरोबर वाटते. परंतु, जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीचे क्रश (Crush) असता तोपर्यंत हे घडतं. तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण सतत तुमच्या जवळ राहण्याचं कारण शोधत असेल आणि तुमचा सहवास त्याला किंवा तिला आवडत असेल तर ती व्यक्ती मनातून तुमच्या प्रेमात पडली आहे, असं समजावं. काही जण प्रेमाची कबुली देण्यास घाबरतात किंवा काही परिस्थिती त्यांना तुमच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यापासून रोखते; पण ते तुमच्यासमोर त्यांच्या मनात येणाऱ्या भावना रोखू शकत नाहीत. एखादा मित्र किंवा मैत्रीण नव्यानं मैत्री झाल्यावर तुमच्याशी बराच वेळ बोलत असेल, गप्पा मारत असेल, मेसेज करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला आवडता असा अर्थ असू शकतो; पण या बाबी काहीशा गोंधळात टाकणाऱ्याही असू शकतात. आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत एखादी व्यक्ती 24 पैकी 12-14 तास तुम्हाला मेसेज करत असेल तर हे केवळ प्रेम आहे, असं समजून घेतलं पाहिजे. हे वाचा -  Women Expectations : जुने फंडे आता काम करत नाहीयेत; चाळीशी ओलांडलेल्या बायकोला असं करा इम्प्रेस एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्या कम्फर्ट झोनमधून (Comfort Zone) बाहेर येऊन तुम्हाला मदत करत असते. परंतु, नव्यानं मैत्री झाल्यावर एखादा मित्र किंवा मैत्रीण प्रत्येक वेळी तुमच्या मदतीसाठी सर्वप्रथम येत असेल तर त्या व्यक्तीच्या मनात तुमच्यासाठी प्रेमभावना आहे, असं समजावं. जेव्हा एखाद्या व्यक्तीची तुम्हाला काळजी असते किंवा तिला तुमची गरज असते, तेव्हाच तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडत असता. तुम्हाला एखादा मित्र किंवा मैत्रीणीबाबत असे अनुभव येत असतील तर त्याच्या/तिच्या मनात तुमच्याविषयी प्रेम आहे असं समजायला हरकत नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात