मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्ही सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहात का? डॉक्टरांनी असे प्रश्न विचारले तर महिलांनो अजिबात लाजू नका, अन्यथा...

तुम्ही सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहात का? डॉक्टरांनी असे प्रश्न विचारले तर महिलांनो अजिबात लाजू नका, अन्यथा...

महिलांनो, खोटं बोलणं महागात पडू शकतं.

महिलांनो, खोटं बोलणं महागात पडू शकतं.

महिलांनो, खोटं बोलणं महागात पडू शकतं.

  नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : आहाराच्या योग्य सवयींबरोबरच वेळच्या वेळी आरोग्य तपासणी करणंही महत्त्वाचं असतं. यामुळे अनेक आजार टाळता किंवा लवकर बरे करता येतात. डॉक्टरांकडे नियमित तपासणी करणं व त्यांच्या प्रश्नांना कोणत्याही आडपडदा न ठेवता उत्तरं देणं बऱ्याचदा स्त्रियांना जमत नाही. विशेषतः सेक्स लाइफबद्दल व लैंगिक अवयवांच्या आरोग्याविषयी स्त्रियांमध्ये अनास्था असते; मात्र तसं करणं हिताचं नसतं.

  उलट डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची न लाजता व न घाबरता उत्तरं (Don’t Shy While Answering Questions Of Doctor) दिल्यानं तुमच्या अनेक शंकांचं निरसन होईल व तुम्ही अधिक आरोग्यपूर्ण जीवन जगाल. त्याविषयी जाणून घेऊ या. 'आज तक हिंदी'ने याबाबत माहिती देणारं सविस्तर वृत्त दिलं आहे.

  स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी स्त्री-रोगतज्ज्ञ (Gynecologist) मार्गदर्शन करतात. स्त्रियांमधली मासिक पाळी, सेक्स लाइफ, इतर लैंगिक समस्या यांच्याविषयी समाधानकारक उत्तरं स्त्री-रोगतज्ज्ञांकडूनच मिळू शकतात; मात्र डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरं न दिल्यास योग्य उपचारही सांगता येत नाहीत. म्हणून स्त्री-रोगतज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांना महिलांनी न घाबरता उत्तरं द्यायला हवी. ते प्रश्न कोणते असू शकतात, ते पाहू या.

  Pregnancy Diet & Precautions : प्रेग्नेंट झाल्यावर 'या' गोष्टी टाळा, अन्यथा बाळावर होईल गंभीर परिणाम

  - तुम्ही सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहात का?

  - असे खासगी प्रश्न विचारलेलं कदाचित तुम्हाला आवडणार नाही; पण अशाच प्रश्नांच्या आधारे डॉक्टर तुम्हाला कोणत्या तपासण्या कराव्या लागतील, हे ठरवू शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्यायला लाजू नका.

  - मासिक पाळी वेळेवर येते का?

  - स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं चक्र 28 दिवसांचं असतं. त्याच्या 3-4 दिवस मागे-पुढे पाळी आली, तरी ते नॉर्मल असतं; पण यात जास्त अंतर पडलं, तर ते अनियमित पाळीचं लक्षण असतं. काही वेळा याचा गंभीर त्रास होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचं मार्गदर्शन जरूर घ्यावं.

  - संभोगावेळी रक्तस्राव होतो किंवा दुखतं का?

  - संभोगावेळी कधी तरी रक्तस्राव होत (Bleeding During Sex) असेल किंवा दुखत असेल, तर काही अडचण नाही; मात्र असं वारंवार होत असेल, तर डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. याकरिता डॉक्टर व्हजायनल इन्फेक्शनच्या तपासण्या किंवा एंडोमेट्रिओसिस करायला सांगू शकतात.

  - सेक्स पार्टनर किती?

  - अशा प्रश्नांवर स्त्रिया चिडतात किंवा घाबरतात. गेल्या 15 वर्षांपासून एकाच व्यक्तीसोबत राहत असल्यास डॉक्टर STD अर्थात लैंगिक माध्यमातूम पसरणाऱ्या आजारांची तपासणी करायला सांगत नाहीत; मात्र एकाच महिन्यात 3-4 व्यक्तींसोबत संबंध आले असल्यास ही तपासणी करण्याची आवश्यकता असते.

  - स्तनतपासणी स्वतः करता का?

  - प्रत्येक स्त्रीनं स्वतः स्तनतपासणी (Breast Self-Check) केली पाहिजे. याविषयी स्त्रियांना आठवण करून देणं ही डॉक्टरांची जबाबदारी असते. कोणत्या पद्धतीनं स्तनतपासणी करता येते, याविषयी डॉक्टर अधिक चांगलं मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे डॉक्टरांना योग्य माहिती पुरवणं गरजेचं असतं.

  Blotted Stomach : पाळीदरम्यान पोट फुगण्याची समस्या होईल दूर, फक्त तुमच्या या सवयींमध्ये करा बदल

  - व्हजायनल डिस्चार्जचा रंग किंवा वास बदलला आहे का?

  - स्त्रियांचा स्वभाव पाहता काही वेळा डॉक्टरही हा प्रश्न विचारत नाहीत; मात्र तुमच्या व्हजायनल डिस्चार्जचा (Vaginal Discharge) रंग किंवा वास बदलला असेल, तर बॅक्टेरिअल इन्फेक्शनचं ते लक्षण असू शकतं. यावर सहज मात करता येते. स्त्रियांनी याविषयी डॉक्टरांशी बोललं पाहिजे.

  - गर्भनिरोधक उपायांबाबत समाधानी आहात का?

  - लैंगिक आरोग्याविषयी चर्चा करताना डॉक्टर हा प्रश्न हमखास विचारतात. तसं होत नसेल, तर दुसऱ्या चांगल्या डॉक्टरचं मार्गदर्शन घ्यायला हवं. स्त्री-रोगतज्ज्ञांनी गर्भनिरोधक उपायांबाबत स्त्रियांना माहिती द्यायला हवी. स्त्रियांनीही याविषयी मोकळेपणानं माहिती दिली, तर त्याविषयी योग्य मार्गदर्शन डॉक्टर करू शकतील.

  स्त्रियांनी त्यांचं लैंगिक आरोग्य (Reproductive Healt) चांगलं ठेवण्यासाठी स्त्री-रोगतज्ज्ञांशी वेळोवेळी चर्चा केली पाहिजे. नियमित तपासण्या केल्या पाहिजेत. त्यामुळे लैंगिक आरोग्याविषयीच्या शंकांचं समाधान होईल व अनेक गैरसमज दूर होतील.

  First published:
  top videos

   Tags: Health Tips, Sex education, Women safety